Sunday, November 27, 2022

चोपड्यात सैराट… भावानेचं संपवले बहिणीसह तिच्या प्रियकराला…

- Advertisement -

 

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क;  

- Advertisement -

- Advertisement -

जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात धक्कादायक कृत्य समोर आले आहे. आपल्या सख्ख्या बहिणीला व तिच्या प्रियकराला एका अल्पवयीन भावाने ठार मारल्याची घटना घडली आहे. ऑनर किलिंगमधून दोघांचा खून झाला आहे. त्याने प्रियकराला पिस्तुलीने गोळी घालून तर बहिणीचा गळा आवळून खून केला आहे. या कृत्याने सारा परिसर हादरला आहे.

सविस्तर वृत्त असे की, चोपडा शहर पोलीस स्टेशन मध्ये रात्री साडेदहाच्या सुमारास एक अल्पवयीन मुलगा सिनेमाच्या दृश्याप्रमाणे पिस्टल घेऊन हजर झाला. आणि आपण दोघांचाही खून केल्याची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ चोपडा लगत जुना वराड रोड शिवारात पाहणी केली. यावेळी त्यांना नाल्यात दोघांचे मृतदेह आढळून आले. त्यात मुलाची गोळी मारून तर मुलीचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे समोर आले.

दरम्यान, पोलिसांनी दोन अल्पवयीन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. तर दोघांचा शोध अद्याप सुरू आहे. वर्षा समाधान कोळी (वय २०, रा. सुंदरगढी, चोपड़ा) आणि राकेश संजय राजपूत (वय २२, रा. रामपुर चोपडा) अशी मयत दांपत्याची नावं आहेत. प्रेम संबंधातून खून झाल्याची माहिती समोर आली असून, या प्रकरणी मयत मुलीचा अल्पवयीन भाऊच फिर्यादी झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पुढील तपास सहा. पोलीस अधीक्षक श्री. रावले हे करीत आहेत.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या