जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयांतर्गत अशासकिय कर्मचारी पद भरती

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या सैनिकी मुलांचे वसतिगृह व माजी सैनिक बहुउद्देशिय सभागृह जळगाव आणि माजी सैनिक बहुउद्देशिय सभागृह रावेर येथे तात्पुरत्या स्वरुपात रोजंदारी पध्दतीने प्रत्येकी एक असे सहाय्यक अधिक्षक व सफाई कामगार ही पदे माजी सैनिक संवर्गातून भरावयाची आहेत. यासाठी २४ जानेवारी पर्यंत इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

यात वसतिगृह सहाय्यक अधिक्षक पदासाठी एक जागा असून यासाठी माजी सैनिक प्रवर्गातील हवालदार, नायब सुभेदार किंवा त्यापेक्षा मोठ्या पदावरून निवृत्त झालेले अर्ज दाखल करु शकतात. मराठी व इंग्रजी टाईपिंग येत असलेल्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. सफाई कामगार या पदाकरिता माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवार अथवा माजी सैनिक उपलब्ध न झाल्यास नागरी उमेदवारांचा विचार करण्यात येणार आहे.

अर्ज दाखल करण्यासाठी आधारकार्ड, बँक पासबूक, रहिवाशी दाखला, दोन फोटो व Police verification certificate आवश्यक असणार आहे. निवड करण्याचे किंवा एखादा अर्ज कोणतेही कारण न देता निकाली काढण्याचे सर्व अधिकार जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी राखून ठेवले आहेत. अधिक माहितीसाठी ०२५७-२२४१४१४. या दुरध्वनीवर संपर्क साधावा.

तरी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज अन्य आवश्यक कागदपत्रांसह २४ जानेवारी पर्यंत जळगाव येथील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे सादर करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.