सैनिकांची प्रश्न सोडविण्यासाठी तालुका स्तरावर समिती बैठकीचे वेळापत्रक

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव यांच्या अधिपत्याखाली तालुक्यातील आजि/माजि सैनिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तालुकास्तरावर समिती बैठकीबाबत सर्व आजि / माजि सैनिक व माजि सैनिक विधवा, शहिद सैनिकांचे कुटुंब व कार्यरत सैनिकांचे कुटुंब विविध्द विभागातील शासकिय कामे जलतरीत्या व प्राध्यान्याणे निर्गत करण्यासाठी तालुका स्तरावर बैठकी घेण्यात येणार आहे. तरी आजि / माजि सैनिक व माजि सैनिक विधवा, शहिद सैनिकांचे कुटुंबतील व्यक्तीनी तालुकास्तरीय वेळापत्रकाप्रमाने व त्या तारखेनुसार व दिलेल्या वेळे नुसार आपल्या तालुक्यातील तहसिल कार्यालय येथे हजर राहण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

रावेर येथे ०४ फेब्रुवारी २०२५ रोजी १०:३० वाजता, पारोळा येथे ०५ फेब्रुवारी २०२५ रोजी १०:३० वाजता, अमळनेर येथे ०५ फेब्रुवारी २०२५ रोजी ०१:०० वाजता, एरंडोल येथे ०६ फेब्रुवारी २०२५ रोजी १०:३० वाजता, धरणगाव येथे ०६ फेब्रुवारी २०२५ रोजी ०१:३० वाजता, मुक्ताईनगर येथे ११ फेब्रुवारी २०२५ रोजी १०:३० वाजता, बोदवड येथे ११ फेब्रुवारी २०२५ रोजी ०१:३० वाजता, यावल येथे १३ फेब्रुवारी २०२५ रोजी ११:०० वाजता , भुसावळ येथे १८ फेब्रुवारी २०२५ रोजी ११:०० वाजता,  चाळीसगाव येथे २० फेब्रुवारी २०२५ रोजी ११:३० वाजता,  भडगाव येथे २५ फेब्रुवारी २०२५ रोजी १०:३० वाजता, पाचोरा येथे २५ फेब्रुवारी २०२५ रोजी ०१:३० वाजता ,चोपडा येथे ०४ मार्च २०२५ रोजी १०:३० वाजता , जामनेर येथे ०६ मार्च २०२५ रोजी ११:०० वाजता , जळगाव येथे ११ मार्च २०२५ रोजी ११:०० वाजता तालुका स्तरावर समिती बैठकी आयोजित करण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.