जळगाव ;- येथील निर्भय प्रकाश परिवारातर्फे सालाबादप्रमाणे खंडेराव नगर येथे २ जुलै रोजी गरजू विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी सेवानिवृत्त कर अधीक्षक चंद्रकांत पंधारे , बापूजी अहिरे , मीनाबाई अहिरे,भारत अहिरे,कोमल अहिरे, वैशाली अहिरे,निर्भय प्रकाशचे योगेश अहिरे आदी उपस्थित होते.
गरजू विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्य मिळाल्याने त्यांच्या चेहरयावर आनंद दिसून येत होता . बीएम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष योगेश नन्नवरे यांनी पाच विद्यार्थ्याच्या शेक्षणिक जबाबदारी उचलली आहे. . तसेच कार्यक्रमासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, योगेश नन्नवरे , आशिष इलेकट्रीकल्सचे संजय इंगळे, जिल्हा रुग्णालयचे डॉ. जितेंद्र सुरळकर यांचे अनमोल सहकार्य लाभले.
येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये शहरातील विविध भागातील गरजू विद्यार्थ्याना निर्भय प्रकाश परिवारातर्फे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येणार असल्याची माहिती योगेश अहिरे यांनी दिली.