अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क
मंत्री अनिल पाटील आणि माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्यात मनोमिलन झाले आहे. या निर्णयाचे सर्व आजी, माजी नगरसेवकांसह शेतकरी बांधव व जनतेनेही स्वागत केले आहे.
दि. 29 रोजी राजवड येथे साहेबराव पाटील यांच्या निवासस्थानी हे मनोमिलन घडून आले. यावेळी आगामी काळातील राजकीय वाटचाली संदर्भात बऱ्याच चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. मंत्री अनिल पाटील यांनी विधानसभा तर साहेबराव पाटील यांनी नगरपालिकेत नेतृत्व अशी आमची सर्वांची इच्छा असून तसा आग्रह साहेबराव पाटील यांना धरल्याने निश्चितच ते देखील सकारात्मक राहतील असे त्यांनी सांगितले. याबाबत कुणीही अधिकृत वक्तव्य केलेले नसले तरी यानिमित्ताने दोघांमध्ये दिलजमाई झाली हे मात्र निश्चित आहे.
याप्रसंगी मंत्री अनिल पाटील यांच्यासोबत माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील तसेच माजी नगरसेवक व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित असल्याचे त्यांनी सांगितले. अनिल पाटील यांनी यावेळी साहेबराव पाटील यांच्यासह माजी नगराध्यक्ष पुष्पलता पाटील यांचे आशीर्वाद देखील घेतले असून त्यांनीही आशीर्वाद दिले आहेत.
आगामी नगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने देखील मजबूत पाठबळ देण्याचे सकारात्मक संकेत अनिल पाटलांनी दिल्याने सर्व नगरपालिका निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांचे मनोबल वाढले असून कोणत्याही परिस्थितीत अनिल पाटलांना आमदार करण्याचा निर्धार सर्वानी व्यक्त केला आहे. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले असल्याने अनेकांनी याचे स्वागत केले आहे. मंत्री अनिल पाटील यांनी मतदारसंघात जो भरघोस विकास केला तो जनता उघड्या डोळ्यांनी पाहत असून साहेबराब दादांची आमदारकी नंतर नगरपरिषदेतील कारकीर्द सर्वानी अनुभवली आहे. यामुळे दोन्ही नेते एक सोबतच जनतेलाही हवे असल्याने सर्वानी हे मनोमिलन घडवून आणले असल्याची माहिती विनोद लांबोळे यांनी दिली आहे.