Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नव्या आयुक्तांकडून अपेक्षा!
    • जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 
    • तुकाराम मुंढे यांचा धडाका : भेसळकरांना भरली धडकी!
    • अमृत योजनेच्या निकृष्ट कामाविरोधात मनपावर ‘घागर फोडो’ मोर्चा!
    • इस्रायलमध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार
    • कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक
    • पाकिस्तानच्या जवानांचा थेट कामावर येण्यास नकार
    • युवासेना आयोजित जिल्हास्तरीय ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर तातडीची कार्यवाही करण्याचे निर्देश
    जळगाव

    सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर तातडीची कार्यवाही करण्याचे निर्देश

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 12, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    जिल्ह्यातील नगरपरिषद, नगर पंचायतीमध्ये काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या, प्रलंबित रजा रोखीकरण याबाबत तातडीने कार्यवाही करावी असे निर्देश महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सोनु सारवान यांनी दिले. सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या, अडचणी व निवेदनांचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते.

    या बैठकीस सहआयुक्त नगरपरिषद, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्ह्यातील सर्व नगर परिषदांचे मुख्याधिकारी, आरोग्य अधिकारी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत हाताने मैला उचलण्यास प्रतिबंध व पुनर्वसन अधिनियम २०१३ ची प्रभावी अंमलबजावणी, सफाई कर्मचाऱ्यांचे सुरक्षित कार्य वातावरण, वैद्यकीय सुविधा, विमा संरक्षण, शासकीय योजनांची अंमलबजावणी व कायम नियुक्तीसंबंधी विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

    आयोगाने संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले असून, सफाई कर्मचाऱ्यांच्या न्यायहक्कांचा विचार करून धोरणात्मक उपाययोजना करण्याबाबत सुचना दिल्या आहेत. तसेच स्थानिक पातळीवरील संघटनांच्या मागण्या शासनस्तरावर धोरणनिर्धारणासाठी आयोगास सादर करण्याबाबत निर्देशित करण्यात आले आहे.

    बैठक संपल्यानंतर सफाई कामगार संघटनांनी उपाध्यक्षांचा सत्कार केला. सारवान यांनी हा सत्कार नम्रतेने स्वीकारून सर्व अधिकारी व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. आयोगाने सर्व संबंधित संस्थांना आपल्या कार्यवाही अहवालांची प्रत वेळेत आयोगास सादर करण्याचे आदेश देत, आवश्यक त्या उपाययोजना तत्काळ राबविण्याचे निर्देश देऊन बैठक संपन्न झाल्याचे जाहीर केले.

    jalgaon Safai Karmachari
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 

    June 9, 2026

    कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक

    June 9, 2026

    अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ : बंद घराचे कुलूप तोडले

    June 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif