मुलायम सिंह यादव यांच्या पत्नी साधना यादव यांचे निधन…

0

 

लखनऊ, लोकशाही न्यूज नेटवर्क ;

समाजवादी पक्षाचे (SP) संस्थापक मुलायम सिंह यादव (MulayamSingh Yadav) यांच्या पत्नी साधना यादव यांच्यावर मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते, तेथे त्यांनी आज सकाळी अखेरचा श्वास घेतला, असे सपा सूत्रांनी सांगितले. मुलायम सिंह यादव यांच्या त्या दुसऱ्या पत्नी होत्या.

त्यांना गेल्या तीन महिन्यांपासून फुफ्फुसाचा संसर्ग आणि आरोग्याच्या इतर समस्या होत्या. त्यांच्यावर मेदांता हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते, तिथे आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला, असे सूत्रांनी सांगितले. साधना यादव या मुलायम सिंह यादव यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या. त्यांची पहिली पत्नी आणि सपा (SP) प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्या आई मालती देवी यांचे 2003 मध्ये निधन झाले.

मुलायमसिंह यादव त्यांच्या पत्नीच्या निधनाच्या वेळी दिल्लीत होते, पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की, मृतदेह लखनौला आणला जात आहे. अखिलेश यादव व्यवस्थेवर देखरेख करत आहेत आणि अंतिम संस्कारांचा तपशील लवकरच निश्चित केला जाईल, असे ते म्हणाले. साधना गुप्ता यांच्या निधनाचे वृत्त समजताच पक्षाचे वरिष्ठ नेते आणि कार्यकर्ते सपा प्रमुखांच्या घरी पोहोचू लागले.

Leave A Reply

Your email address will not be published.