Tuesday, May 24, 2022

वकील सदावर्ते यांना सातारा जिल्हा न्यायालयाकडून जामीन मंजूर

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

सातारा : वकील सदावर्ते यांना सातारा जिल्हा न्यायालयाकडून जामीन मंजूर. सातारा येथील खासदार उदयनराजे भोसले आणि कोल्हापूर येथील खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी त्‍यांना चार दिवसांच्या मिळालेल्या पोलीस कोठडी सुनावण्‍यात आली हाेती.

- Advertisement -

पोलीस कोठडी संपल्यानंतर अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्‍यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्‍यात आली हाेती. यानंतर सदावर्ते यांच्या वकिलांनी जामीन अर्ज केला. यावर पुन्हा युक्तिवाद झाला. मात्र, जामीन अर्जावर निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला. मंगळवारीही याबाबत निर्णय झाला नाही. आज न्यायालयाने सदावर्ते यांना सातारा शहर पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात १५ हजार रुपयांचा जामीन मंजूर केला.

छत्रपतींच्या वारसांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना सातारा जिल्हा व सत्र न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. सातारा शहर पोलिसांनी गुणरत्न सदावर्ते यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता ६ वे प्रथम न्यायदंडाधिकारी एस. ए. शेंडगे यांनी सदावर्ते यांना सोमवार पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. यावेळी कोर्टात दोन्ही बाजूकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायाधीशांनी युक्तिवादाचे अवलोकन करून निर्णय दिला.

सरकार पक्षाने १४ दिवसांची पोलीस कोठडी मागत विविध मुद्द्यांचा तपास करायचा असल्याचे सांगितले. यावेळी तपास अधिकारी आणि सरकार पक्षाचे दोन वकील असे तिघेजण बोलले. सरकार पक्षाचा युक्तिवाद झाल्यानंतर बचाव पक्षाच्या वतीने सर्व मुद्दे खोडून काढण्यात आले आणि पोलिस कोठडीची आवश्यकता नसल्याचे सांगण्यात आले.

युक्तिवाद सुरू असताना दोन्ही पक्षांमध्ये दोनदा खडाजंगी झाली. खा. उदयनराजे यांचा पराभव का झाला? असा मुद्दा बचाव पक्षाने मांडताच सरकार पक्षाने त्यावर तीव्र आक्षेप घेतला. यावर बचाव पक्षाने हे वक्तव्य मागे घेत सपशेल माफी मागितली. माफीनाम्यानंतर सरकार पक्षाने सुमोटो गुन्हा दाखल करण्याचीही मागणी केली होती.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या