कानपूर, लोकशाही न्युज नेटवर्क
गेल्या काही दिवसांपासून रेल्वे अपघात मोठ्या प्रमाणावर होत आहेत. उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यात शुक्रवारी रात्री उशिरा रेल्वे अपघात झाला. कानपूर आणि भीमसेन स्थानकांदरम्यानचे अनेक डबे रुळावरून घसरले. दरम्यान या अपघातात कोणीही गंभीर जखमी झालेले नाही.
#WATCH | Uttar Pradesh | Visuals from the site where train number 19168, Sabarmati Express derailed in a block section between Kanpur and Bhimsen station.
No injuries to anyone were reported from the site, so far pic.twitter.com/dRpiTaUPMA
— ANI (@ANI) August 17, 2024
मिळालेल्या माहितीनुसार, दगड इंजिनवर आदळल्याचे चालक सांगत आहेत. इंजिनच्या कॅटल गार्डचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी रात्री उशिरा घटनास्थळी पोहोचले.
घटनास्थळी पोहोचलेल्या रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, कानपूरजवळील गोविंद पुरीसमोर होल्डिंग लाइनवर ट्रेनचे अनेक डबे रुळावरून घसरले. ही ट्रेन वाराणसीहून अहमदाबादला जात होती. रात्री ३ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. सध्या साबरमती एक्स्प्रेस ट्रेनमधील सर्व प्रवाशांना अपघातस्थळावरून बसने कानपूरला आणण्यात आले आहे.
ट्रेन क्रमांक 19168 साबरमती एक्स्प्रेस वाराणसीहून अहमदाबादला जात असताना कानपूर आणि भीमसेन स्थानकादरम्यान रुळावरून घसरली. भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षिततेची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना देण्यासाठी आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत.
दरम्यान अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी संपूर्ण ट्रेनचे नुकसान झाले आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. पायलट दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्याच्या सूचना आहेत.