कीस्टोन रिअल्टर्सना रुस्तमजी सीझन्ससाठी पूर्ण भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त 

0

 लोकशाही, विशेष लेख

 

मुंबई-बांद्रा कुर्ला संकुलाच्या मध्यभागी वसलेले, रुस्तमजी सीझन्सच्या (Rustamji Seasons) शेवटच्या टॉवरला भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झाले असून मुंबईतील एक नामांकित प्रकल्प तयार झाला आहे. २०१५ साली या प्रकल्पाचे काम सुरु केले होते व आजमितीला मुंबईतील सर्वात जलद वेगाने काम झालेला अशी या प्रकल्पाची ओळख झाली आहे. हा प्रकल्प सुरू झाल्यापासून यातील सर्व भागधारकांनी तसेच ग्राहकांनी यात विशेष स्वारस्य घेतले आहे. ३.८ एकरांमध्ये पसरलेल्या रुस्तमजी सीझन्स या प्रकल्पात एकूण ६ टॉवर असून वीस पेक्षा अधिक अत्याधुनिक सुविधा आहेत. बांद्रा कुर्ला संकुल हे मुंबईतील सर्वात वेगाने वाढलेले आर्थिक केंद्र असून यात भारतात व भारताबाहेरच्या असंख्य कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, संचालक व इतर उच्च पदावर काम करणाऱ्या नागरिकांना हा प्रकल्प एक निवासाची उत्तम संधी उपलब्ध करून देत आहे.

या प्रकल्पात ४०० हुन अधिक कुटुंबे येथे राहत असून येथून मुंबई एअरपोर्ट तसेच नरिमन पॉईंट (Nariman Point), नवी मुंबई व ठाणे येथे आपण सहज पोहचू शकतो. बांद्रा रेल्वे स्टेशन तसेच मेट्रोचे वाढलेले जाळे पाहता येथे राहणाऱ्या नागरिकांचा प्रवास सुखकर होणार आहे. उत्तम व अत्याधुनिक डिझाईन थिंकिंग हा या प्रकल्पाचा गाभा असून या प्रकल्पात उत्कृष्ट वास्तुविशारद आणि इंटीरियर डिझायनर-अल्फाझ मिलर (Alfaz Miller) यांच्या डिझाइन संकल्पना साक्षात उतरवल्या  आहेत. २०२२  मध्ये, प्रकल्पाने केवळ वर्षातील सर्वोत्कृष्ट पुनर्विकास प्रकल्पाचा पुरस्कार जिंकला नाही तर वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीसाठी CRE मॅट्रिक्सद्वारे शेजारच्या मूल्यानुसार विक्री प्रकल्पात एक नंबरवर आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.