Monday, September 26, 2022

रशिया-युक्रेन युद्धाला सुरुवात; रशियाकडून अनेक ठिकाणी बॉम्बहल्ले

- Advertisement -

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

रशिया-युक्रेन वाद कायम असून रशियाने युक्रेनविरोधात युद्धाची (Russia -Ukraine war) घोषणा केली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Russia president Vladimir Putin) यांनी रशियाच्या लष्कराला युक्रेनवर कारवाईचे आदेश दिले आहेत. यानंतर रशियाकडून युक्रेनमधील अनेक ठिकाणी बॉम्बहल्ले करण्यात आल्याचं वृत्त समोर येत आहे.

- Advertisement -

- Advertisement -

याच दरम्यान बॉम्बहल्ल्याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, मारियुपोल येथे रात्रीच्या सुमारास स्फोट झाल्यावर आकाशात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट दिसून येत आहेत. मात्र, हा गोळीबारामुळे झाला आहे की स्फोट झाल्याने झाला आहे हे अद्याप स्पष्ट नाहीये.

गुरुवारी सकाळी डोनेत्सक येथे पाच स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. काही दिवसांपूर्वीच रशियाने पूर्व युक्रेनमधील डोनेत्सक (Donetsk) आणि लुगंस्क (Lugansk) यांना स्वतंत्र राज्य म्हणून मान्यता दिली होती. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेन विरुद्ध लष्करी कारवाईची घोषणा केली आहे. युद्ध टाळता येणार नाही असं पुतिन यांनी म्हटलं आहे.

न्यूज एजन्सी एएफपीने दिलेल्या वृत्तानुसार, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी हा आदेश जारी करत म्हटले की, युक्रेन मागे हटलं नाही तर युद्ध सुरुच राहील. पुतिन यांनी युक्रेनच्या लष्कराला शक्य तितक्या लवकर शस्त्रे टाकण्यास सांगितलं आहे तसे नाही केले तर युद्ध टाळता येणार नाही असंही पुतिन यांनी म्हटलं आहे. गुरुवारी पहाटे साडे तीन वाजता पोर्ट सिटी मारियुपोल येथे मोठ्या स्फोटाचा आवाज ऐकू आला. हे ठिकाण रशियाच्या सीमेजवळ आणि स्फोट झालेल्या ठिकाणापासून 30 मैल दूर आहे.

रशियन सैन्याने या परिसरात गोळीबार केल्याचंही वृत्त समोर येत आहे. त्याचवेळी फुटीरतावाद्यांनी केलेल्या हल्ल्यात युक्रेनचे दोन सैनिक ठार झाल्याची बातमी समोर आली आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या वादात रशियाने आपली आक्रमक वृत्ती कायम ठेवत थेट युद्धाची घोषणा केली.

रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाई करण्याची घोषणा झाल्यावर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांची प्रतिक्रिया आली आहे. बायडेन यांनी म्हटलं, संपूर्ण जग आमच्यासोबत आहे. या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यात येईल.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या