रशिया-युक्रेन युद्ध.. बघा थरारक व्हिडिओ

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

रशिया-युक्रेन यांच्यातील तणाव वाढत असून अखेर रशिया-युक्रेन युद्धाला सुरुवात झाली आहे. प्रदीर्घ तणावानंतर रशियाने गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता युक्रेनवर हल्ला केला. क्षेपणास्त्र हल्ल्यात 8 युक्रेन नागरिक ठार झाले आहेत. दुसरीकडे, युक्रेनने रशियाची 6 लढाऊ विमाने पाडल्याचा दावा केला आहे. युक्रेनमधील अनेक गावे रशियन सैन्याच्या ताब्यात गेल्याचे सांगण्यात येत आहे. इथे एका पाठोपाठ एक बॉम्बस्फोट होत आहेत.

रशियाने युक्रेनवर आक्रमण केले आहे. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या आदेशानंतर लष्कर आणि वायूदलाने युक्रेनवर जोरदार मारा सुरू केला आहे. रशियाचे लष्कर युक्रेनमध्ये शस्त्रास्त्रांसह दाखल झाले आहे.

तर, वायूदलाने युक्रेनची शक्तीस्थळे असलेल्या राजधानीसह अन्य महत्त्वाच्या ठिकाणांवर हवाई हल्ले सुरू केले आहेत. या हल्ल्यांमध्ये युक्रेनचे अनेक नागरिक जखमी तर काही नागरिक ठार झाल्याचे सांगितले जात आहे. रशिया किंवा युक्रेन या दोन्ही देशांपैकी कुणीही अद्याप अधिकृत माहिती सादर केलेली नाही. या युद्धातील विविध घटनांचे व्हिडिओ सध्या सोशल मिडियात व्हायरल होत आहेत. त्यातील हे काही थरार व्हिडिओ..

 

https://twitter.com/WorldWarTV/status/1496766352194899974?s=20&t=v0cQ4eIFZ88h0Km-4SnHIA

 

युक्रेनच्या विमानतळावर केलेला हल्ला

https://twitter.com/Tanmaycoolkarni/status/1496735430112206848?s=20&t=GGf1yfYRaHkb1v4p0OZ3qw

युक्रेनची अनेक शहरे दहशतीखाली असे आहे वातावरण

https://twitter.com/thongnoiiz/status/1496747248666873858?s=20&t=yl4v1y628FVREz02ESFs_g

 

रशियाकडून अनेक घातक क्षेपणास्त्रांचा वापर

 

https://twitter.com/WorldWarTV/status/1496749264160051205?s=20&t=yl4v1y628FVREz02ESFs_g

स्वतःचा जीव वाचविण्यासाठी नागरिक युक्रेनची राजधानी कीवमधून पलायन करीत आहेत. त्यामुळे कीव शहराबाहेर पडण्यासाठी वाहनांच्या अशा लांब रांगा बघायला मिळत आहेत. 

https://twitter.com/WW32022/status/1496737432816926725?s=20&t=HtqTxfP1iM4BEvDirh6SwA

 

Leave A Reply

Your email address will not be published.