Friday, September 30, 2022

युक्रेनमधील भारतीय दूतावासाने सर्व भारतीय नागरिकांना तात्काळ कीव्ह सोडण्यास एडवायजरी केली जारी

- Advertisement -

लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याच्या सहाव्या दिवशी राजधानी कीव्हमधील नागरिकांवरील धोका अधिकच वाढला आहे. युक्रेनमधील भारतीय दूतावासाने सर्व भारतीय नागरिकांना तात्काळ कीव्ह सोडण्यास सांगितले आहे. दूतावासाने जारी केलेल्या आपत्कालीन एडवाइजरीमध्ये असे म्हटले आहे की, भारतीयांनी ते ज्या स्थितीत आहेत त्या स्थितीत त्वरित शहर सोडावे.

- Advertisement -

- Advertisement -

रशियासोबतच्या युद्धादरम्यान अमेरिका, युक्रेनला समर्थन देत आहे. अमेरिकेने न्यूयॉर्क स्थित स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला यूक्रेनच्या झेंड्यामध्ये गुंडाळले आहे. यापूर्वी अनेक देशांनी युक्रेनचे समर्थन करण्यासाठी ऐतिहासिक इमारतींना युक्रेनच्या झेंड्याच्या रंगांनी चमकवले होते.

SBI ने रशियाच्या प्रतिबंधित संस्थांसह व्यापार करणे बंद केले. तर रशियाने आपल्या लोकांच्या विदेशातील मनी ट्रान्सफरवर बंदी घातली.

फ्रान्सने युक्रेनमध्ये आपल्या एंसेंबीला कीवहून लीवमध्ये ट्रान्सफर केले. ऑस्ट्रेलिया युक्रेनला 75 मिलियन डॉलर देईल. यूरोपीय देश युक्रेनला 75 फायटर प्लेन देणार.

युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी रशियन सैन्यावर खार्किवमध्ये एका रहिवासी भागात रॉकेट डागल्याचा आरोप केला, ज्यामध्ये डजनभर नागरिकांचा मृत्यू झाला.

युरोपियन यूनियनने क्रेमलिनचे प्रवक्ता दिमित्री पेसकोव्ह आणि रशियन तेल कंपनी रोसनेफ्टचे CEO इगोर सेचिन यांच्यावर बॅन लावला.

राजधानी कीवपासून केवळ 27 किमी दूर आहे रशियन फौज

सॅटेलाइट-इमेजिंग कंपनी मॅक्सर टेक्नॉलॉजीजने प्रसिद्ध केलेल्या उपग्रहात असे दिसून आले आहे की, रशियन सैन्य राजधानी कीवपासून सुमारे 27 किलोमीटर अंतरावर असलेल्या अँटोनोव्ह विमानतळाजवळ पोहोचले आहे. सुमारे 65 किलोमीटर लांब लष्करी ट्रक आणि रणगाडे येथे दिसले. युक्रेनच्या सीमेवर तैनात असलेल्या सुमारे 75% रशियन सैन्याने युक्रेनमध्ये प्रवेश केल्याचे अमेरिकन संरक्षण विभाग पेंटागॉनने म्हटले आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या