Monday, September 26, 2022

युक्रेनमधून 242 भारतीय मायदेशी परतले (व्हिडीओ)

- Advertisement -

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

रशिया- युक्रेनमधील तणाव कायम आहे. रशिया- युक्रेनमधील युद्ध स्थिती वाढत असून अमेरिकेनेही रशियाविरुद्धात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. युक्रेनमधील सतत बदलणारी परिस्थिती आणि तणावाच्या पार्श्वभूमीवर 242 भारतीय (Indian) दिल्लीत परतले आहेत. काही दिवसांपूर्वीच भारत सरकारने युक्रेनमधील भारतीयांना मायदेशी परतण्याचे आव्हान केले होते.

- Advertisement -

- Advertisement -

मायदेशी परतलेल्यांपैकी बहुतेक युक्रेनमध्ये वैद्यकशास्त्र शिकणारे विद्यार्थी आहेत. भारतीय विद्यार्थ्यांनी आपल्या मातीत येताच सुटकेचा नि:श्वास सोडला. तर युक्रेनवर रशिया आणि अमेरिकेच्या (America) नेतृत्वाखालील नाटो यांच्यातील वाढत्या तणावादरम्यान आपल्या मुलांच्या सुरक्षिततेबद्दल विद्यार्थ्यांचे पालक चिंतित होते. विमान टर्मिनल 3 वर उतरताच थांबलेल्या भारतीय अधिकाऱ्यांनी प्रवाशांचे स्वागत केले. प्रवाशांनीही विजयाचे निशाण दाखवून हस्तांदोलन करून आभार मानले. ते येताच प्रवाशांनी ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्या.

दिल्लीला परतल्यानंतर युक्रेनमध्ये वैद्यकशास्त्र शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने सांगितले की, “विद्यार्थी असताना मला तिथे (युक्रेन) खूप भीती वाटायची. आता इथे आल्यावर मला सुरक्षित वाटत आहे. तर, युक्रेन मध्ये MBBS चे शिक्षण घेणारा दुसरा भारतीय विद्यार्थी शिवम चौधरी दिल्ली विमानतळावर म्हणाला, ‘यावेळेपर्यंत शांतता होती, मात्र तणाव वाढतच होता. म्हणून आम्ही घरी परतण्याचा निर्णय घेतला आणि आता आम्हाला येथे आल्याने दिलासा मिळाला.

रशियाने युक्रेनच्या डोनेस्तक आणि लुगान्स्क या बंडखोरांचे वर्चस्व असलेल्या भागांना स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली आहे. यासोबतच रशियाच्या संसदेने राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना देशाबाहेरही सैन्य वापरण्याची परवानगी दिली आहे. तेव्हापासून येथे तणाव वाढला आहे. रशियाच्या या निर्णयानंतर अमेरिका आणि इतर अनेक पाश्चात्य आणि युरोपीय देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध जाहीर केले आहेत.

परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी रात्री सांगितले की, विविध राज्यांतील भारतीय मंगळवारी रात्री युक्रेनमधून दिल्लीला परतत आहेत. युक्रेनमधून परतणाऱ्या भारतीयांच्या मदतीसाठी येत्या काही दिवसांत आणखी उड्डाणे चालवली जातील, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या