Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीचे जागावाटप गिरीश महाजनांकडे!
    • लाचखोर अभियंता शिसोदे यांच्याकडे सव्वा पाच कोटींचे घबाड
    • नवी मुंबईत गोळीबार : दोन तरुणी गंभीर जखमी
    • राज्यातील शेतकऱ्यांची दुष्काळ निधी मिळवताना परवड
    • अजितदादांच्या पक्षात होणार उलथापालथ?
    • अमिताभ बच्चनच्या ‘जलसा’वर दहशतीचे सावट!
    • दानाचे महत्व सांगणारी ‘धनत्रयोदशी’!
    • सात अटी मान्य करा, अन्यथा होर्मुजची खाडी खुली नाही!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ब्रेकिंग»रशियाकडून तेल निर्यातीच्या बंदीची घोषणा
    ब्रेकिंग

    रशियाकडून तेल निर्यातीच्या बंदीची घोषणा

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 26, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करावी, याकरिता भारतावर मोठा दबाव टाकण्याचे काम अमेरिकेचे सुरू आहे. भारत हा रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत असल्याने अमेरिकेने भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला. मात्र, तरीही भारताने अमेरिकेचा अटी मान्य केल्या नाहीत. जगात चीननंतर भारत हा रशियाकडून सर्वात जास्त तेल खरेदी करतो आणि हीच पोटदुखी डोनाल्ड ट्रम्प यांची आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी नाटो देशांना पत्र लिहित म्हटले की, जोपर्यंत चीन हा रशियाकडून तेल खरेदी बंद करत नाही, तोपर्यंत चीनवर निर्बंध लादा 50 किंवा 100 टक्के टॅरिफ लावा. भारतालाही कोंडीत पकडण्याचा प्रयत्न अमेरिकेकडून केला जात आहे.

    रशिया हा जगातील सर्वात मोठा तेल निर्यातदार आहे. सध्याच्या घडीला रशिया हा अनेक देशांना तेल निर्यात करतो. मात्र, आता रशियाने तेल निर्यातीवर तात्पुरती बंदी घातल्याची घोषणा केली आणि एकच खळबळ उडाली. अमेरिका रशियाच्या अर्थव्यवस्थेला धक्का देण्यासाठी भारतासह चीनवर रशियाकडून तेल खरेदी न करण्यासाठी दबाव टाकत आहे. त्यामध्येच आता रशियाने तेल निर्यातीवर तात्पुरती बंदी घोषित केल्याने अनेक देशांची झोप उडालीये.

    रशियाने स्पष्ट केले की, डिझेल निर्यातीवर वर्षाच्या अखेरपर्यंत बंदी घालत आहोत. पेट्रोल निर्यातीवरील बंदी डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली. रशियाचे उपपंतप्रधान अलेक्झांडर नोवाक यांनी यावर भाष्य केले. काही दिवसांपूर्वी युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यात रशियाच्या रिफायनरीजना मोठे नुकसान झाले. त्यामुळे इंधन पुरवठ्यात अडथळा निर्माण होतोय. यामुळेच रशियाने तेल निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

    ड्रोन हल्ल्यांमध्ये युक्रेनने रशियन तेल शुद्धीकरण कारखान्यांना टार्गेट केले होते आणि मोठे नुकसान देखील झाले. रशियाचे उपपंतप्रधान यांनी यावर बोलताना म्हटले की, रशियन तेल शुद्धीकरण कारखान्यांवर युक्रेनियन ड्रोन हल्ल्यांमुळे पेट्रोलियम उत्पादनांची थोडीशी कमतरता निर्माण झाली आहे. मात्र, ही कमतरता आम्ही भरून काढू आणि ही समस्या लवकर सोडवली जाणार आहे. या बंदीचा कोणताही परिणाम भारतावर होणार नाही. रशियाकडून तेल खरेदी करणारा भारत हा मोठा ग्राहक आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Alexander Novak America Ban Crude oil Donald Trump India oil exports oil purchase Russia
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    भयंकर! एकाच कुटुंबातील ७ जणांची निर्घृण हत्या!

    November 6, 2026

    ओबीसी क्रिमिलियरबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

    November 6, 2026

    जैन इरिगेशनच्या एकत्रित महसुलात १०.१ टक्क्यांची वाढ

    November 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif