Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 
    • तुकाराम मुंढे यांचा धडाका : भेसळकरांना भरली धडकी!
    • अमृत योजनेच्या निकृष्ट कामाविरोधात मनपावर ‘घागर फोडो’ मोर्चा!
    • इस्रायलमध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार
    • कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक
    • पाकिस्तानच्या जवानांचा थेट कामावर येण्यास नकार
    • युवासेना आयोजित जिल्हास्तरीय ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    • ओमानच्या समुद्रात तेलवाहू जहाजावर मोठा हल्ला
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राजकारण»रुपाली चाकणकर यांची तब्बल साडेपाच तास चौकशी
    राजकारण

    रुपाली चाकणकर यांची तब्बल साडेपाच तास चौकशी

    एसआयटी चौकशीनंतरची प्रतिक्रिया आली समोर
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 11, 2026No Comments340 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    अशोक खरात प्रकरणात आज एसआयटीकडून रुपाली चाकणकर यांची चौकशी करण्यात आली? रुपाली चाकणकरांची एसआयटी चौकशी आता संपलेली आहे. खरातसोबतच्या आर्थिक आणि संस्थात्मक संबंधांसदर्भात एसआयटीकडून त्यांची चौकशी करण्यात आली. समोर आलेल्या माहितीनुसार साधारणपणे साडेपाच तास एसआयटीकडून त्यांची चौकशी करण्यात आली. आपण एसआयटीच्या चौकशीला समर्पक अशी उत्तरं दिल्याची माहिती या चौकशीनंतर रुपाली चाकणकर यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.

    त्यांचे जे काही प्रश्न होते, त्या सर्व प्रश्नांची समर्पक अशी उत्तरं मी दिलेली आहेत. मला असा विश्वास वाटतो की, या उत्तरांमुळे सर्वांचं समाधान झालं असेल, असं यावेळी रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे. दरम्यान यावेळी तुम्ही पुन्हा चौकशीला येणार आहात का? तुम्हाला पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे का? असा प्रश्नही यावेळी चाकणकर यांना विचारण्यात आला. या प्रश्नावर मात्र त्यांनी बोलणं टाळलं आहे. पोलिसांना या प्रकरणातील तपासामध्ये माझं जसं सहकार्य हवं असेल तसं मी सहकार्य करेल असं त्यांनी म्हटलं आहे.

    दरम्यान यावेळी चाकणकर यांना पत्रकारांनी असाही प्रश्न विचारला की या प्रकरणात तुम्हाला नक्की काय-काय प्रश्न विचारण्यात आले. यावर उत्तर देताना ते तुम्हाला अहवाल आल्यावर समजेलच असं यावेळी रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे. एक वाजता एसआयटी चौकशीला सुरुवात झाली, चार तासांची चौकशी झाली अशी माहिती देखील यावेळी रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.

    दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार अंदाजे साडेपाच तास एसआयटीकडून रुपाली चाकणकर यांची चौकशी करण्यात आली. ज्यामध्ये तुम्ही अशोक खरातला कधीपासून ओळखता? शिवणीका संस्थांवर असताना या सगळ्या खरात प्रकरणाची तुम्हाला माहिती होती का? अशोक खरात सोबत ज्या पूजा विधी केल्या त्या नेमक्या कोणत्या होत्या? खरातसोबत काही आर्थिक संबंध होते का? अशोक खरात सोबत काढलेले फोटो व्हिडिओ नेमके केव्हाचे आहेत आणि कोणत्या कार्यक्रमातील आहेत? शिवनीका संस्थांच्या बैठकांमधून कोणते कामकाज सुरू होते? असे काही प्रश्न चाकणकर यांना यावेळी विचारण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. एसआयटीच्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी रुपाली चाकणकर यांची चौकशी केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 

    June 9, 2026

    अमृत योजनेच्या निकृष्ट कामाविरोधात मनपावर ‘घागर फोडो’ मोर्चा!

    June 9, 2026

    कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक

    June 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif