Wednesday, August 10, 2022

बनावट RTPCR प्रकरण; दोघांवर गुन्हा दाखल होणार – डॉ. रामानंद

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

जळगाव जिल्ह्यातील कोरोनाच्या बनावट आरटीपीसीआर चाचणी प्रकरण चांगलेच गाजले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कोरोनाच्या बनावट आरटीपीसीआर चाचणी गुन्ह्यात अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी गठीत केलेल्या समितीचा अहवाल सकाळी सादर झाला. या अहवालाप्रमाणे अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

- Advertisement -

- Advertisement -

जिल्हा सामान्य रूग्णालयात बोगस आरटीपीसीआर अहवाल मिळतात याबाबत बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी शल्यचिकित्सा विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ.प्रशांत देवरे यांच्या अध्यक्षतेखाली व उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगिता बावस्कर, डॉ. संदीप पटेल यांच्या सदस्यत्वाखालील समिती नेमली होती.

या समितीने तीन दिवस चौकशी करून अहवाल तयार केला. अहवाल शनिवारी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांना सादर केला. त्यानुसार अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी दोषी सुरक्षारक्षक राजेंद्र दुर्गे आणि डाटा एंट्री ऑपरेटर स्वप्नील पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड यांना दिले आहे.

सुरक्षारक्षक दुर्गे व डाटा एंट्री ऑपरेटर स्वप्नील पाटील यांनी गैरव्यवहार केल्याचे लेखी मान्य केले असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिली. यात शिक्का व सही बनावट आढळले आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, असेही डॉ. रामानंद यांनी सांगितले. दरम्यान, दुर्गे व स्वप्नील पाटील हे नातेवाईक आहेत.

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनीदेखील बनावट आरटीपीसीआर अहवाल प्रकरणी समिती नेमलेली आहे. उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, जिल्हा शल्यचिकित्सक, वैद्यकीय अधीक्षक यांची समिती नेमली आहे. या समितीने देखील सकाळी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांची भेट घेऊन अधिष्ठाता यांनी नेमलेल्या समितीशी चर्चा केली.३८ लोकांचे जबाब या समितीने नोंदवल्यानंतर कारवाईची शिफारस केली आहे

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या