RSS मानहानी प्रकरण: राहुल गांधींना शिवडी कोर्टात जामीन मंजूर

0

मुंबई :-  गौरी लंकेश हत्या प्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात ट्विट केल्यानंतर राहुल गांधी यांच्यावर दावा दाखल केला होता. याप्रकरणी राहुल गांधी मुंबईतल्या शिवडी न्यायालयात हजर झाले. त्यावेळी राहुल गांधींनी आपण दोष नसल्याने न्यायालयासमोर सांगितले. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या आरोपांवरही आपण ठाम असल्याचे त्यांनी सांगितले. न्यायालयाने १५ हजारांच्या जातमुचलक्यावर राहुल गांधी यांना जामीन मंजूर केला आहे. मुंबईतील काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड हे राहुल गांधींसाठी जामीन राहिले.

राहुल गांधी यांनी गौरी लंकेश यांच्या हत्येचा संबंध आरएसएसशी जोडणारे ट्विट केले होते. याप्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राहुल गांधींविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. दरम्यान, या खटल्याच्या सुनावणीवेळी राहुल गांधी आज शिवडी येथील न्यायालयात उपस्थित राहिले. यावेळी आपण निर्दोष असल्याचे तसेच गौरी लंकेश हत्येप्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक  संघावर केलेल्या आरोपांवर आपण ठाम असल्याचे राहुल गांधी यांनी न्यायलयासमोर सांगितले. त्यानंतर न्यायालयाने 15 हजार रुपयांच्या हमीवर त्यांचा जामीन मंजूर केला.

राहुल गांधी जेव्हा मुंबईत दाखल झाले तेव्हा विमानतळावरच त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. कृपाशंकर सिंह, मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी, संजय निरूपम यांचीही मुंबई विमानतळाबाहेर हजेरी होती. ‘राहुल तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा मुंबई विमानतळावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.