RRR चित्रपटाला जपानमध्ये उदंड प्रतिसाद, सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

RRR या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केलेत. नुसताच रेकॉर्ड नाही तर प्रेक्षकांनी अक्षरशः ह्या चित्रपटाला आपल्या डोक्यावर घेतले. आणि सर्वात महत्वपूर्ण गोष्ट काय RRR चित्रपटातील “नाटु नाटु” गाण्याने तर ऑस्कर सारखा बहुप्रतिष्ठित पुरस्कार आपल्या नावे केला आहे. आणि ‘नाटू नाटू’ या गाण्याने मूळ गाण्याच्या श्रेणीत ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर चित्रपटाच्या या विजयाने संपूर्ण देशाला अभिमान आणि आनंद वाटत आहे.

त्याचवेळी ‘आरआरआर’ने आणखी एक मैलाचा दगड पार केला आहे. ‘RRR’ने जपानमध्ये 80 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे. यासह हा चित्रपट जपानमध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.’RRR’ 21 ऑक्टोबरला जपानमध्ये रिलीज झाला होता. तो येथे 200 स्क्रीन्सवर आणि 44 शहरांमध्ये प्रदर्शित झाला. RRR ला जपानमध्ये 31 IMAX स्क्रीन मिळाल्या. पहिल्या दिवसापासूनच जपानमध्ये या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे या चित्रपटाची कमाई दिवसेंदिवस वाढत आहे. यासोबतच जपानमध्ये चित्रपटाला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर हा आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट बनला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.