Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • महामार्ग बायपासचा अट्टाहास अखेर नडला!
    • प्रवास ग्रंथालयांचा : माहिती संग्रहालय ते आधुनिक ग्रंथालय!
    • ‘डॉल्फिन’ आणि ‘चान-होम’ चक्रीवादळांमुळे भारताला धोका
    • अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!
    • बापरे! भटक्या श्वानाचा कहर; १३० जणांना चावला!
    • ए.आर. रहमानच्या मुलाचा मध्यरात्री भीषण अपघात
    • फुटलेल्या सहा खासदारांमध्ये चलबिचल वाढली
    • संघर्ष पेटला : झारखंडमध्ये जंतरमंतरसारखी पुनरावृत्ती
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»अपघात»आरपीएफ जवानाचा स्थानकावर आत्महत्येचा प्रयत्न
    अपघात

    आरपीएफ जवानाचा स्थानकावर आत्महत्येचा प्रयत्न

    डोक्यात गोळी झाडून स्वतःला संपवण्याचा प्रयत्न
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 16, 2026No Comments380 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

    येथील रेल्वे स्थानक परिसरात आज मध्य रात्री १२ ते १ च्या दरम्यान एक अत्यंत धक्कादायक घटना घडली असून, रेल्वे संरक्षण दल (RPF) मधील जयपाल सिंह नामक जवानाने स्वतःवर डोक्यात गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.

    ही घटना आरपीएफ कार्यालयात घडल्याचे समजते. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित जवानाने डोक्यात गोळी झाडून स्वतःचे जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे रेल्वे स्थानक परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

    घटनेनंतर तात्काळ जखमी जवानाला वैद्यकीय उपचारासाठी हलविण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथे रवाना करण्यात आले आहे. या दरम्यान डॉ. अनिल शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याची माहिती मिळत आहे.

    घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, आत्महत्येचा प्रयत्न का केला याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. संबंधित प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, या घटनेमुळे रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली असून, अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!

    August 10, 2026

    बापरे! भटक्या श्वानाचा कहर; १३० जणांना चावला!

    August 10, 2026

    ए.आर. रहमानच्या मुलाचा मध्यरात्री भीषण अपघात

    August 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif