चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क
मागील वर्षांपासून भद्रावती शहरात रोटरी क्लब सामाजीक बांधिलकीतून विविध कार्यक्रमाचे आयोजन करत असतात जसे आरोग्य, शिक्षण, गरजु नागरीकांना छत्री वाटपाचे विविध कार्यक्रम आयोजित करत असतात.
विधानसभा निवडणूक असल्याने आपण उत्सव मेळ्याचे आयोजन न केल्याचे हाॅटेल सन्नी पाईंट येथील पत्र परिषदेत उत्सव मेला समिती कळून देण्यात आले, पण आता दि.२० व २५ डिसेंबर ला ख्रिसमस मुहूर्तावर रोटरी उत्सव मेळ्याचे आयोजन, सांस्कृतिक, कार्यक्रमचा मेजवानीच उत्साहात होणार असुन ऑडिशन १५ व १६ डिसेंबर ला शहरातील सेलिब्रेशन हाॅल येथे १० ते ५ वाजेपर्यंत होणार असल्याचे सांगितले.
या दरम्यान सांस्कृतिक स्पर्धेत वगवेगळ्या गटात प्रथम व व्दितीय येणार्या विजयी स्पर्धेकाला आकर्षक बक्षीस देण्यात येईल, या मेल्यात विविध आकाश झुला सारखे आकर्षक झुले सुध्दा मेळ्यात येणार्या नागरीकांचा मनोरंजन करीता रहाणार सोबतच रंगबेरंगी आकर्षक फटाका शो सुध्दा आयोजित करण्यात आला असल्याची आयोजकांनी माहीत दिली.
या होणाऱ्या रोटरी उत्सव मेलाचे आनंद येथील समस्त नागरीकांनी घ्यावा असे आवाहन रोटरी क्लबचे अध्यक्ष किशोर खंडारकर, सचिव आत्माराम देशमुख, माजी अध्यक्ष अनिल धानोरकर, प्रविण महाजन, सुनिल पोटदुखे, ज्ञानेश्वर हटवार, हनुमान घोटेकर, विक्रांत बिसेन, प्रकाश पिंपळकर, यांनी केले आहे.