Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्हा बँक निवडणुकीत बिनविरोधाची योजना फिस्कटली!
    • अमित शाहांनी अजितदादाचं जगणं मुश्किल केलं होतं!
    • दिल्लीत पुन्हा इमारत कोसळली, २ जणांचा मृत्यू
    • गुलाबराव पाटील यांची जिल्हा बँकेत एन्ट्री!
    • लवकरच १४५ किमी प्रतितास वेगाने धडकणार चक्रीवादळ
    • जिल्हा बँकेवर गिरीश महाजन यांची निर्विवाद बाजी!
    • रुपाली चाकणकरांची थेट सेन्सॉर बोर्डाला धमकी
    • वायर कट करताना विजेचा धक्का लागून माय-लेकाचा मृत्यू
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»भरतनाट्यम, संतूर वादनाची रसिकांनी अनुभवली जुगलबंदी
    जळगाव

    भरतनाट्यम, संतूर वादनाची रसिकांनी अनुभवली जुगलबंदी

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJanuary 20, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टतर्फे छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात डान्स ॲन्ड ट्यून्स हा संतूरवादन व भरतनाट्यम्‌ नृत्याविष्काराची जुगलबंदी रसिकांनी अनुभवली. प्रारंभी भरतनाट्यम्‌ कलावंत डॉ.स्वाती दैठणकर यांच्यासह व्यासपीठावर उपस्थित रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 चे डीजीएन डॉ. राजेश पाटील, सहप्रांतपाल उमंग मेहता, रोटरी वेस्टचे माजी अध्यक्ष संदीप काबरा, अध्यक्ष विनीत जोशी, प्रशासकीय सचिव भद्रेश शाह, प्रकल्पसह प्रमुख नेहा जोशी यांच्याहस्ते दीपप्रज्वलन, नटराज पूजनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

    कार्यक्रमास आमदार राजूमामा भोळे, भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ. केतकी पाटील आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन वेणू जोशी हिने केले. कोषाध्यक्ष सी.ए.स्मिता बाफना यांनी आभार मानले. सुरुवातीला डॉ. स्वाती दैठणकर यांच्यासह त्यांच्या शिष्या राजलक्ष्मी बागडे, मैथिली साने व श्रेया जोशी यांनी विविध भावमुद्रा, कथानकांसह भरतनाट्यम्‌चा नृत्याविष्कार सादर केला. गणेशवंदना, विष्णू- महादेवावर आधारित ‘हरि हर’ संकल्पना, संत नामदेवांच्या गुरुवाणीवर आधारित मराठी- पंजाबी भक्तिगीतावर नृत्यवाणी सादर केली. डॉ.स्वाती दैठणकर यांनी एकल भरतनाट्यमचा प्रयोग सादर करताना गजेंद्रमोक्षम, द्रौपदी वस्त्रहरण शीळेतून अहिल्या प्रगटली, रामायणातील शबरी इत्यादी कथानक रसिकांसमोर उभे केले. समारोपात विठ्ठलाचा अभंग आरतीरुपात नृत्यातून सादर करण्यात आला.

    डॉ. धनंजय दैठणकर व त्यांचे पुत्र निनाद यांनी युगल संतूर वादन सादर केले. प्रारंभी राग यमनमधील आलाप, नंतर मध्य द्रूत तीन तालातील बंदीश सादर करत पिता-पुत्रांनी रसिकांची मने जिंकली. यशस्वीतेसाठी सुनील मंत्री, मुकेश हासवानी, कृष्णकुमार वाणी, सुनील सुखवानी, योगेश राका, देवेश कोठारी यांचे सहकार्य लाभले.

     

    संतूर वादन व भरतनाट्यम्‌ची जुगलबंदी

    दैठणकर परिवारातील संतूर वादन व भरतनाट्यम्‌ची जुगलबंदी जळगावकर रसिकांना अभुवायला मिळाली. डॉ. धनंजय व निनाद दैठणकर यांच्या संतूर वादनावर डॉ. स्वाती दैठणकर यांनी विविध कथानकांसह भावमुद्रांच्या आधारे नृत्याविष्कार सादर केला.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    jalgaon Rotary Club of West
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    गुलाबराव पाटील यांची जिल्हा बँकेत एन्ट्री!

    November 17, 2026

    जिल्हा बँकेवर गिरीश महाजन यांची निर्विवाद बाजी!

    November 17, 2026

    वायर कट करताना विजेचा धक्का लागून माय-लेकाचा मृत्यू

    November 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif