Tuesday, November 29, 2022

रोटरीचा स्तुत्य उपक्रम; तब्बल ५०० झाडांची लागवड

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

वाढदिवस म्हटलं म्हणजे आजकाल मोठमोठ्या पार्ट्या केल्या जातात. पण समाजात आजही असे लोकं आहेत जे आपल्या वाढदिवसाला काहीतरी सामाजिक कार्य करतात. याचे एक उत्तम उदाहरण द्यायचे झाले तर रोटरिअन्स किशोरभाई तलरेजा.

- Advertisement -

- Advertisement -

रोटरीतर्फे नाविन्यपूर्ण उपक्रम 

समाजाची उन्नती व्हावी तसेच समाजाचे आपण काही देणे लागतो. या भावनेतून सृष्टी संवर्धन, आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक, मेडिकल, नॉन मेडिकल, जनजागृतीपर, महिला सक्षमीकरण, विविध शिबिरे, समाजातील विविध प्रश्न सोडवणे, गरजवंतांना मदत करणे असे नावीण्यपूर्ण उपक्रम रोटरी क्लब जळगावतर्फे राबविले जातात.

वाढदिवसानिमित्त तब्बल ५०० झाडांची लागवड 

किशोरभाई तलरेजा यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त तब्बल ५०० झाडांचे वृक्षारोपण करत पर्यावरणपूरक उपक्रम राबविला. जळगाव शहरापासून काही अंतरावर असलेल्या उमाळा शिवारातील विपश्यना केंद्राच्या नयनरम्य परिसरात हे वृक्षारोपण केले. यावेळी सर्व रोटेरिअन्सने विपश्यना केंद्रात ध्यानधारणा केली तसेच विविध खेळ खेळून मोठ्या उत्साहात किशोरभाईंचा वाढदिवस साजरा केला.

झाडांचं काळजीपूर्वक संवर्धन

या सर्व ५०० झाडांचं अत्यंत काळजीपूर्वक संवर्धन केलं जाईल. या झाडांना पाणी देण्यासाठी तसेच त्यांची देखभाल करण्यासाठी दोन लोकांची देखील नेमणूक करण्यात आलीय. ही संपूर्ण झाडं हैद्राबादवरून मागविण्यात आली आहेत. यात पिंपळ, शिसम, बेल, सीताफळ, आंबा अशा विविध झाडांचा समावेश आहे.

 यांचे मिळाले सहकार्य 

रोटरी पी पी संदीप शर्मा यांचे वडील सतीश कुमार शर्मा यांच्या जन्मदिनानिमित्त ७५ रोपं, तसेच रोटरी इलेक्ट प्रेसिडेंट मनोज जोशी यांनी त्यांचे वडील अशोक जोशी यांच्या जन्मदिनानिमित्त ७५ रोपं आणि  रोटरी डॉक्टर पराग जहागीरदार यांनी 100 रोपं दिली आहेत. तसेच या उपक्रमासाठी रोटरी क्लब जळगाव, ओम योगा ग्रुप, लाइनन्स ग्रुप यांचे सहकार्य मिळाले अशी माहिती किशोरभाई तलरेजा यांनी दिली.

जळगावकरांनी उपक्रमात सहभागी व्हावे

प्रदूषण रोखण्यासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्व जळगावकरांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन रोटरीतर्फे करण्यात आलंय.  तब्बल ५०० झाडांची लागवड करून रोटरीने समाजासमोर एक आदर्श उभा केला आहे. या उपक्रमाचे विविध स्तरातून कौतुक केले जात आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या