रोटरी क्लबच्या वर्धापनदिनानिमित्त युवा संसद उत्साहात
प्रतीसंसदेत विद्यार्थ्यांचा सहभाग : विचारांचे झाले आदान-प्रदान
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
रोटरॅक्ट क्लब ऑफ द इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चने रोटरी क्लब जळगावच्या वर्धापनदिनानिमित्त युवा संसद कार्यक्रमाचे आयोजन रोटरी हॉल मध्ये केले होते. ही संसद उत्साहात संपन्न झाली.
प्रमुख पाहुणे गव्हर्नर इलेक्ट किशोर राठी (नागपूर) उपस्थित होते. माजी गव्हर्नर डॉ. सिकची, प्रेसिडेंट ॲड. सागर चित्रे, सचिव पराग अग्रवाल, माजी अध्यक्ष प्रेम कोगटा, डॉ. शमा सुबोध, असिस्टंट गव्हर्नर जितेंद्र ढाके, डॉ धनश्री चौधरी, डॉ. दिपाली पाटिल जयवर्धन नेवे हे उपस्थित होते.
या उपक्रमाचा उद्देश फक्त विद्यार्थ्यांनाच नाही तर सर्व नागरिकांना संसदीय कार्यपद्धतींची विषयी माहितीचे आदानप्रदान करणे त्यासाठी पुरक ठरणारे तरुण नेतृत्व पुढे आणणे हा होताच पण त्याच बरोबरीने युवा पिढीमध्ये पब्लिक स्पिकींगची सवय सकारात्मक पध्दतीने वाढवणे हा होता. या पार्लमेंटमधील सहभागी सर्व विविध विषयांवरील वादविवाद आणि चर्चां सर्व संसदीय पध्दतीने हे विद्यार्थीनी सादर केलेत. मॉक संसदेने या कार्यक्रमातून उपस्थितांसमोर प्रतिसंसद उभी केली. ज्यात विवीध संसदिय प्रक्रिया आणि लोकशाही संस्थांच्या कार्यपद्धतीबद्दल एक दृष्टिक्षेप टाकला आणि संसदेत काय होणे अपेक्षित आहे आणि काय टाळणे गरजेचे आहे यावर या तरूण संसदेने आईस ब्रेकींग थाटात सादरीकरण केले. यावेळी प्रा. डॉ. बी.व्ही. पवार यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. डॉ. शिल्पा बेंडाळे, किरण बेंडाळे यांचे विशेष सहकार्य लाभले.
यांचा होता सहभाग
या उपक्रमासाठी सौरभ माळी, अथर्व वरुडकर, कल्पेश महाजन, भूमिका पाटील, निधी चौहारी, कल्याणी सुतार, मयूर बडगुजर, गायत्री भोईटे, प्रतिक साळी, आदिती पाटील, पुनम महाले, इच्छा रघुवंशी, रुख्मिना झाल्टे, मुस्कान आहुजा, कुमकुम जोशी, ऋषी बोराळे, रोहन बोराळे, मोनिष नाईक, ओम गुरव, प्रेम पाटील, ऋषिकेश देशमुख, श्रद्धा पोपली, ज्ञानेश्वर पाटील, तन्वी वाघ, श्रेणिक खिवसरा, तन्मय अटवाल, ऋषिकेश चौधरी, विश्वेश वंजारी, मोहित सुर्यवंशी, प्रथमेश बारी, वैभव निकुंभ, अबरार शेख, भावेश शिंपी, ओम पाटील, स्वप्नील मराठे, प्रथमेश मराठे, हेमंत फुलमाळी यांनी सहभाग घेतला होता.