अभियांत्रिकी महाविद्यालयात रोजगार मेळावा संपन्न

अनेकांना मिळाल्या नोकरी : स्वप्न झाले साकार

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय येथे करण्यात आले होते.

या मेळाव्याला शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुहास गाजरे, मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संदीप गायकवाड हे उपस्थित होते. या मेळाव्या करिता नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव येथील उद्योजक व आस्थापनांनी सहभाग नोंदवला होता तसेच उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक, गोविंदा एचआर सर्विसेस नाशिक, हिताची इष्टिमो ब्रेक सिस्टीम्स जळगाव, स्पेक्ट्रम इलेक्ट्रिकल्स जळगाव, किरण मशीन टूल्स जळगाव अशा एकूण 15 आस्थापनांनी 1100 पेक्षा जास्त रिक्त पदे अधिसूचित केली होती. या मेळाव्याला 393 उमेदवार उपस्थित होते त्यापैकी 203 उमेदवारांनी मुलाखती दिल्या. मुलाखती दिलेल्या उमेदवारांपैकी एकुण 122 उमेदवारांची प्राथमिक निवड व 7 उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली.

या मेळाव्याचे प्रास्ताविक संदीप गायकवाड यांनी केले. याप्रसंगी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास गाजरे यांनी महाविद्यालयात सुरु असलेले अभ्यासक्रम व सोई सुविधा याबाबत माहिती दिली व उद्योजकांनी जास्तीत जास्त उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध करुण देण्याबाबत आवाहन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.