Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग
    • महामार्गावर तीन नव्हे, चार उड्डाणपूल हवेत!
    • गुटखा, पान मसाला आणि इतर प्रतिबंधित उत्पादनांवर बंदी
    • मुंबई पोलीस दलाची प्रतिमा काळवंडली
    • दूध संघात उद्या प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन
    • वंदे मातरम्‌‍ला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण!
    • भाविकांच्या गाडीला अपघात : १२ जण जखमी
    • मराठी येत नसल्यास चालकाचे लायसन्स होणार रद्द!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जिल्हा कृषी औद्योगिक संस्थेच्या चेअरमनपदी रोहित निकम
    जळगाव

    जिल्हा कृषी औद्योगिक संस्थेच्या चेअरमनपदी रोहित निकम

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 19, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जिल्हा कृषी औद्योगिक संस्थेच्या चेअरमनपदी रोहित निकम

    व्हाईस चेअरमनपदी अरविंद देशमुख यांची बिनविरोध निवड

    जळगाव: जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत रोहित निकम यांची चेअरमनपदी, तर अरविंद देशमुख यांची व्हाईस चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

    संस्थेचे नेतृत्व तिसऱ्या पिढीकडे

    जळगाव जिल्ह्यातील सहकार व पणन क्षेत्रातील एक प्रमुख संस्था म्हणून ओळखली जाणारी जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्था १९५६ मध्ये स्थापन झाली. संस्थेचे नेतृत्व यापूर्वी बॅरिस्टर बॅवराव निकम यांनी केले होते. त्यानंतर दिलीपराव निकम यांनी संस्थेचा कारभार सक्षमपणे सांभाळला. आता निकम परिवारातील तिसऱ्या पिढीकडे संस्थेचे नेतृत्व आले असून रोहित निकम यांनी चेअरमन पदाची जबाबदारी स्वीकारली आहे.

    रोहित निकम हे उच्चशिक्षित असून सहकार क्षेत्रातील त्यांचा दांडगा अभ्यास आहे. यापूर्वी १० वर्षे संचालकपदावर कार्यरत असलेले निकम यांनी संस्थेच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

    सहकार क्षेत्रात रोहित निकम यांचा ठसा

    रोहित निकम हे केंद्रातील कृभको कंपनीचे सभासद असून, राज्य पणन महासंघाचे माजी उपाध्यक्ष राहिले आहेत. तसेच, भाजपा सहकार आघाडी महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष या नात्याने त्यांनी सहकार क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. सध्या जळगाव जिल्हा दूध संघाचे संचालक म्हणूनही ते कार्यरत आहेत.

    नेत्यांचा पाठिंबा आणि निवडणूक प्रक्रियेचा समारोप

    या निवडणुकीसाठी अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील, वस्त्रोद्योग मंत्री राजेश सावकारे, पद्मश्री अॅड. उज्ज्वल निकम, आमदार मंगेश चव्हाण यांचा विशेष पाठिंबा लाभला.

    निवडणूक अधिकारी म्हणून विवेक जनताप यांनी जबाबदारी पार पाडली. यावेळी संचालक राजीव मुकुंदराव पाटील, रमेश जगनाथ पाटील, यादवराव किन्नू पाटील, रामनाथ विधू पाटील, सुधाकर दौलतराव पाटील, मंगेश भरत पाटील, शांताराम चंदा सोनवणे, सोनल संजय पवार, अरुण चाबूराव देशमुख, गजानन देशमुख, प्रशांत लिलाधर चौधरी, अरविंद भगवान देशमुख, निहाल आनंदा नारखेडे, प्रताप हरी पाटील, अरुण आत्माराम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

    arwind deshmukh jalgaon Rohit Nikam
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग

    August 12, 2026

    दूध संघात उद्या प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन

    August 12, 2026

    भाविकांच्या गाडीला अपघात : १२ जण जखमी

    August 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif