लोकशाही न्यूज नेटवर्क
आमदार रोहित पवार हे अजितदादांच्या विमान अपघात की घातपात याविषयी सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यांनी DGCA, सीआयडी, विमान वाहतूक मंत्र्यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे. VSR कंपनीला वाचवण्याचा आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होत असल्याचा त्यांचा गंभीर आरोप आहे. अजितदादांच्या विमान अपघाताच्या तपासाप्रकरणी रोहित पवार यांनी DGCA विरोधात तक्रार करण्याची मागणी केली. ते थेट मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांच्यासोबत आमदार अमोल मिटकरी आणि आमदार संदीप क्षीरसागर हे पण उपस्थित होते. यावेळी पोलीस स्टेशनमध्ये पोलीस अधिकारी आणि त्यांच्यात मोठा वाद पेटला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले.
मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये काय घडलं याची माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिले. यावेळी आमदार संदीप क्षीरसागर, अजितदादांच्या पक्षाचे आमदार अमोल मिटकरी, आ. नाईकवडी आणि अनेक पदाधिकारी त्यांच्या सोबत होते. एफआयआर आज का करण्याचा निर्णय घेतला याची माहिती त्यांनी दिली. डीजीसीएने एक परिपत्रक काढलं. व्हीएसआर कंपनीच्या २५ पैकी ५ विमान थांबवण्याचा आदेश दिले. व्हीएसआर कंपनी विमान अपघाताला कारणीभूत असल्याचे अप्रत्यक्ष समोर आले. त्याआधारे आम्ही एफआयआर दाखल करण्याची मागणी केली. नवीन फौजदारी कायद्याच्या आधारे आम्ही गुन्हा नोंदवण्याची मागणी केली. त्यावेळी अधिकार्यांशी वाद झाला.
अजितदादांच्या विमान अपघातात पाच लोकांचा मृत्यू झाला. ही सर्व घटना आता सर्वांना माहिती आहे. एफआयआर करताना एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याशी वाद झाला. त्यावेळी कनिष्ठ अधिकाऱ्याने हुज्जत घातली. एफआयआर नोंदवायला सुरुवात झाली होती. माझं स्टेटमेंट नोंदवायला सुरूवात झाली तेव्हाच एका मोठी अधिकारी तिथे आले. डीसीपी तिथे आले, ते म्हणाले गुन्हा नोंदवण्यात येणार आहे. तुम्हाला काय करायचं ते करा आम्ही एफआयआर दाखल करून घेऊ शकत नाही. तुम्हाला कुणाला सांगायचे ते सांगा आम्ही गुन्हा नोंदवणार नसल्याचे अधिकारी म्हणाले. मग त्यांना कोणत्या मोठ्या अधिकाऱ्याचा फोन आला असा सवाल रोहित पवार यांनी केला.

