Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आयटी कंपनीतील हिंदू मुलींचे धर्मांतर करून मानसिक छळ!
    • रमेशकुमार मुनोत यांचा मोफत जलकुंड-परळ वाटप उपक्रम सुरूच!
    • जिल्ह्यासाठी पुढील आठवडा ठरणार तापदायक!
    • नवनियुक्त सीर्इओ करिश्मा नायरांनी पदभार स्वीकारला
    • तोल जावुन पडल्याने प्लबींग कारागिराचा मृत्यू
    • जळगाव सराफ बाजारात सोन्या-चांदीची चकाकी वाढली
    • शूद्रातिशूद्रांना हक्काची जाणीव करुन देणारे : ‘क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले’!
    • हायकोर्टाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांचा राजीनामा
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»रोहित पवारांवर ‘राजकारण करत असल्याचा’ आरोप
    ताज्या बातम्या

    रोहित पवारांवर ‘राजकारण करत असल्याचा’ आरोप

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveFebruary 19, 2026No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क 

    राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत नेते अजित पवार यांचं विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं. मात्र हा अपघात नसून त्यात घातपात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून त्यावरूनच अनेक आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. रोहित पवार यांनी अनेक पत्रकार परिषदा घेऊन या अपघाताच्या आदल्या दिवशीच्या घटना, तसेच विमानातील काही गोष्टी, काही त्रुटी निदर्शनास आणऊन दिल्या, पुरावेही सादर केले. मात्र यावर राज्याचे महसूल मंत्री आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल टीका केली होती. रोहित पवार अपघाताचे राजकारण करत असून लोकांचा बुद्धिभेद करत आहेत, अशा शब्दांत त्यांनी रोहित पवारांवर टीकास्त्र सोडलं होतं. त्यांच्या या टीकेवर रोहित पवार यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.

    रोहित पवार यांनी गेल्या आठवड्यात मुंबई व दिल्लीत तसेच काल (18 फेब्रुवारी) मुंबईत पुन्हा पत्रकार परिषद घेत अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबात अनेक प्रश्न उपस्थित केले होते. ब्लॅक बॉक्स, विमानातील इंधन तसेच व्हीएस कंपनीशी सत्तेतल्या काही लोकांची जवळीक अशा अनेक मुद्यांवर रोहित पवार यांनी भाष्य केलं होतं. मात्र त्यांच्या या पत्रकार परिषदेनंतर विखे पाटील यांनी रोहित पवारांवर बोचरी टीका केली. काही लोक दुःखात आधार देण्याऐवजी लोकांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करत आहेत. कोण काय म्हणते, याला फार महत्त्व देण्याची गरज नाही. हा स्वतःची पोळी भाजण्याचा प्रयत्न आहे, असं ते म्हणाले होते. त्यांच्या याच टीकेवर रोहित पवार यांनी एका पोस्टमधून प्रत्युत्तर दिले.

    अजित पवारांचे पुतणे, राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी त्यांच्या X ( पूर्वीच ट्विट) अकाऊंटवर एक पोस्ट लिहीली आहे. काठावर बसून त्यांना आमच्या दुःखाची धग कळणार नाही, असं रोहित पवार यांनी यात म्हटलं आहे.

    रोहित पवार यांची पोस्ट जशीच्या तशी..

    ” ज्येष्ठ नेते विखे-पाटील साहेब यांनी केलेलं विधान अत्यंत क्लेशदायक, आश्चर्यकारक आणि बेजबाबदार आहे. अजिदादांसारखा दुर्दैवी प्रसंग कधीच कुणाच्याही कुटुंबावर ओढवू नये… वेदना काय असते ती ज्याचं जळतं त्यालाच कळतं. अजितदादांच्या अपघाताच्या विषयावर मी राजकारणाचा ‘र’ शब्दही उच्चारला नसताना विखे पाटील साहेब ओढून ताणून या विषयाला राजकारणाशी जोडून विमान अपघाताच्या चौकशीला वेगळं वळण तर देत नाहीत ना? काठावर बसून त्यांना आमच्या दुःखाची धग कळणार नाही, त्यामुळं त्यांनी किमान या विषयाला वेगळे फाटे तरी फोडू नयेत, अशी माझी त्यांना विनंती आहे” असं रोहित पवार यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

    #maharashtra #politics ajit pawar Ajit Pawar accident Allegations Radhakrishna Vikhe Patil response Rohit Pawar
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    खरात पंचतारांकित हॉटेलमधून चालवायचा ‘हवाला रॅकेट’

    April 5, 2026

    “हा सर्वच किती योगायोग आहे. कमाल आहे!”

    March 24, 2026

    कंटेनरच्या जोरदार धडकेत प्रतिष्ठित शेतकरी ठार!

    March 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.