Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतर रोड आता आंदोलनापासून वंचित!
    • मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ
    • गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख
    • अंगणवाडी सेविका व मदतनीसांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट!
    • अपहरणाचा संशय : विमानाचे आपत्कालीन लँडिंग
    • पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन
    • ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी भारत एक मोठी बाजारपेठ
    • दुष्काळी मदतीसह आणखी तीन मोठे निर्णय!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला जळगाव विमानतळ विस्तारासाठीचा आढावा
    ताज्या बातम्या

    जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला जळगाव विमानतळ विस्तारासाठीचा आढावा

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveNovember 27, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला जळगाव विमानतळ विस्तारासाठीचा आढावा

    जळगाव प्रतिनिधी जळगाव विमानतळाचा विस्तार करण्यासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रियेला वेग देण्यासाठी मौजे कुसुंबा (ता. जळगाव) येथील जमीन संपादनाबाबतची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. विमानतळ विकासाच्या संदर्भातील जमीन मोजणी, मालकी, मूल्यांकन आणि पायाभूत सुविधांच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा यावेळी करण्यात आली.

    बैठकीदरम्यान महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (MADC), महसूल विभाग, विमानतळ प्राधिकरण तसेच शेतकरी प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत जमीन संपादन अहवालांचा तांत्रिक आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला जमीन संपादन प्रक्रियेचा अद्ययावत अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले.

    जमीन संपादनासंबंधी प्रलंबित मुद्दे, विकासासाठी आवश्यक रनवे विस्तार, सुरक्षा क्षेत्र वाढ, सेवा सुविधा उभारणी यांसंदर्भातील चर्चा बैठकीत करण्यात आला. तसेच हितसंबंधित शेतकरी प्रतिनिधींशी संवाद साधून त्यांच्या सूचना व मते जाणून घेण्यात आली. बैठकीस महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी मुंबईचे प्रतिनिधी दूरदृश्य प्रणाली द्वारे, भूसंपादन समन्वय अधिकारी ,संबधित विभागीय अधिकारी तसेच शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.

    जळगाव विमानतळ विस्तार हा जिल्ह्याच्या भविष्यातील औद्योगिक, कृषी, पर्यटन आणि सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा टप्पा असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले. भूसंपादन प्रक्रिया पारदर्शक व गतीमान पद्धतीने पूर्ण करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जळगावात उभारणार ‌‘रेडक्रॉस सावली केअर सेंटर‌’!

    October 10, 2026

    योग्य नियोजनाने दुष्काळावरही मात करू!

    October 10, 2026

    मुक्ताईनगर ड्रोन प्रकरणाचा उलगडा; रेकी नव्हे, ते प्रशिक्षण विमान!

    October 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif