टेनिस चा बादशाह फेडरर ला भरल्या डोळ्यांनी भावनिक निरोप…

0

 

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

फेडररने १५ सप्टेंबर रोजी सोशल मीडिया पोस्ट शेअर करून टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली होती. फेडरने लिहिले, ‘मी ४१ वर्षांचा आहे. मी या २४ वर्षात १५००हून अधिक सामने खेळले आहेत. टेनिसने मला पूर्वीपेक्षा जास्त उदारतेने वागवले आहे आणि आता माझी स्पर्धात्मक कारकीर्द कधी संपेल हे मला जाणून घ्यावे लागेल.’

दरम्यान ४१ वर्षीय फेडररने शुक्रवारी, काल २३ सप्टेंबरला अखेरचा सामना खेळाला. मात्र, सामन्यानंतर त्याला आपले अश्रू आवरणे कठीण झाले. यावेळी चाहत्यांनीच नाही, तर जोडीदार राफेल नदाल यानेही फेडररला भरल्या डोळ्यांनी भावनिक निरोप दिला. या सामन्यादरम्यान स्पॅनिश टेनिस स्टार राफेल नदाल फेडररचा जोडीदार होता.

आपल्या शेवटच्या सामन्यात मात्र फेडररला विजयाची गवसणी घालता आली नाही. लंडन येथे खेळवण्यात आलेल्या या सामन्यात अमेरिकेचे फ्रान्सिस टियाफो आणि जॅक सॉक हे फेडररचे प्रतिस्पर्धी होते. या सामन्यात त्याला ४-६, ७-६ (२), ११-९ ने हार पत्करावी लागली. या मॅचनंतर फेडररला भावनिक निरोप दिला गेला.

दरम्यान, या क्षणांचे व्हिडीओ तुफान व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओमध्ये, सामान्यांच्या अखेरीस फेडररच्या डोळ्यातील अश्रू आपण स्पष्टपणे पाहू शकतो. त्याच्याच शेजारी बसलेला राफेल नदालही आपले अश्रू रोखू शकला नाही. यानंतर सर्बियाचे स्टार प्लेअर नोवाक जोकोविच यांच्यासह अनेक खेळाडू तिथे उपस्थित होते. फेडररने त्यांची भेट घेऊन त्यांना आणि टेनिस खेळाला निरोप दिला. यावेळी राफेल नदालसह इतर खेळाडूही भावूक झाले.

पुरुष एकेरीत सर्वाधिक ग्रँड स्लॅम जेतेपदे जिंकण्याच्या बाबतीत रॉजर फेडरर तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत २२ ग्रँडस्लॅम जेतेपदे जिंकली आहेत. तर सर्वाधिक २२ ग्रँड स्लॅम जेतेपदे जिंकून राफेल नदाल या यादीत अव्वल स्थानावर आहे. २८ जानेवारी २०१८ रोजी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये फेडररने आपले शेवटचे ग्रँड स्लॅम जेतेपदे जिंकले. त्यानंतर त्याने क्रोएशियाच्या मारिन सिलिकचा पराभव केला. त्यावेळी २० ग्रँडस्लॅम जिंकणारा तो पहिला पुरुष खेळाडू ठरला. मात्र, या वर्षाच्या शेवटी राफेल नदालने त्याचा विक्रम मोडला.

 

सर्वाधिक पुरुष एकेरी ग्रँडस्लॅम विजेते :

१. राफेल नदाल (स्पेन) – २२ (ऑस्ट्रेलियन – २, फ्रेंच – १४, विम्बल्डन – २, यूएस – ४)

२. नोव्हाक जोकोविच (सर्बिया) – २१ (ऑस्ट्रेलियन – ९, फ्रेंच – २, विम्बल्डन – ७, यूएस – ३)

३. रॉजर फेडरर (स्वित्झर्लंड) – २० (ऑस्ट्रेलियन – ६, फ्रेंच – १, विम्बल्डन – ८, यूएस – ५)

४. पीट सॅम्प्रास (यूएसए) – १४ (ऑस्ट्रेलियन – २, फ्रेंच – ०, विम्बल्डन – ७, यूएस – ५)

 

Leave A Reply

Your email address will not be published.