Saturday, January 28, 2023

देवगिरी एक्सप्रेसवर सशस्त्र दरोडा, तुफान दगडफेक करत प्रवाशांची लूट

- Advertisement -

औरंगाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क

औरंगाबाद येथे देवगिरी एक्सप्रेसवर सशस्त्र दरोडा पडल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पोटूळ रेल्वे स्थानकाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

औरंगाबादहून मुंबईकडे देवगिरी एक्सप्रेस येत असतांना रात्री साधारणत: 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असल्याची माहिती मिळाली आहे. दरोडेखोरांनी पोटूळ रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या सिग्नलला कापड बांधून ठेवले होते. त्याच दरम्यान दरोडेखोरांनी एक्सप्रेसवर जोरदार दगडफेक सुद्धा केली.

- Advertisement -

एक्सप्रेस थांबताच 5 नंबरच्या डब्यापासून 9 नंबरच्या डब्यापर्यंत दरोडेखोरांनी दरोडा टाकला असल्याची माहिती मिळाली आहे. यावेळी दरोडेखोरांनी एक्सप्रेसमधील प्रवाशांचे सोन्याचे दागिने, पैसे, मोबाइल चोरी केल्याची माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि आपला तपास सुरू केला आहे.

दरोडेखोर हे रुग्णवाहिकेतून आले असल्याची माहिती कळत आहे. रुग्णवाहिका रेल्वे ट्रॅकजवळ उभी होती अशी देखील माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर एक्सप्रेस पुन्हा रवाना करण्यात आली आहे.

 

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे