तीन जणाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी केली चोरी

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव; तीन जणाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी केली चोरी एमआयडीसी हद्दीत वेगवेगळ्या तीन घटनेत तीन जणाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन वेगवेगळे गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

एमआयडीसी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या फिर्यादीनुसार नकुल भास्कर पाटील (वय-३१) रा. पाटील वाडा मेहरून या तरूणाची दुचाकी एमआयडीसीतील बेदमुथा कंपनीच्या बाहेर पार्किंगमधून (एमएच१९ एडी ३१२०) क्रमांकाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविली.

दुसऱ्या घटनेत एमआयडीसतील एल सेक्टर मध्ये स्टार कुलर्स ॲण्ड कंडेन्सर या कंपनीच्या बाहेर ज्ञानेश्वर हेमंत बागुले (वय-३१) रा. मेस्को माता नगर जुना आसोदा रोड या तरूणाची (एमएच १९ सीए ४७९६) क्रमांकाची दुचाकी पार्कींगमधून चोरट्यांनी दुचाकी चोरली.

तर तिसऱ्या घटनेत एमआयडीसीतील एल सेक्टर मधील रेखा पॉलीमर या कंपनीसमोर रघुनाथ पांडूरंग चौधरी (वय*-४४) रा. विश्वकर्मा हॉटेज जवळ, रामेश्वर कॉलनी यांची पार्किंगला लावलेली (एमएच १९ यू ९४६०) क्रमांकाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले.

तिघांनी एमआयडीसी पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन वेगवेगळे गुन्हे दखल करण्यात आले आहे. तीन गुन्ह्यांचा तपास पोलीस नाईक गणेश शिरसाळे हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.