बंद घर फोडून ३९ हजार ऐवज लांबविला

0

लोकशाही न्यूज नेटवर्क    

जळगाव ;अज्ञात चोरटयांनी बंद घर फोडून ३९ हजार ऐवज लांबविला. शहरातील नूतन वर्षा कॉलनीतील बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सोने-चांदीचे दागिने व रोकड असा एकूण ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे.रामानंदनगर पोलिस ठाण्यात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रुती श्रीकृष्ण मुजुमदार (वय-६०, रा. नूतन वर्षा कॉलनी, जळगाव) हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. १२ मार्च रोजी त्या घर बंद करून कामानिमित्त बाहेरगावी गेल्या होत्या.

अज्ञात चोरट्यांनी घर बंद पाहून संधी साधत घराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला व घरातील लोखंडी कपाटातून सोन्याचे दागिने, चांदीच्या मुर्त्या व शिक्के आणि १६ हजार रुपयांची रोकड असा एकूण ३९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला.

हा प्रकार २१ मार्च रोजी सकाळी १० वाजता त्या घरी आल्यावर उघडकिला आला. यासंदर्भात गुरुवार ३१ मार्च रोजी रात्री त्यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यावर रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल दिपक शिरसाठ करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.