Wednesday, August 10, 2022

गर्दीचा फायदा घेत बसमध्ये चढतांना महिलेचे दागिन्यांसह रोकड लंपास

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

शहरातील नवीन बसस्थानकात बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी महिलेचे रोकडसह दागिने असा ७६ हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

- Advertisement -

जामनेर तालुक्यातील वाकडी येथील रहिवासी सोजरबाई चतरसिंग राजपूत (वय ५९) या सोमवारी कामानिमित्ताने जळगावात आल्या होत्या. काम आटोपल्यानंतर दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास पुन्हा गावी जाण्यासाठी त्या नवीन बसस्थानकात आल्या. याठिकाणी जामनेकडे जाणार्‍या बसमध्ये चढत असतांना त्यांच्या पर्समध्ये ठेवलेले ३८ ग्रॅमच्या सोन्याच्या दोन पोत तसेच पाच हजार रुपये रोख असा ७६ हजारांचा ऐवज कुणीतरी लंपास केला.

दरम्यान बसमध्ये बसल्यानंतर आपले दागिने तसेच पैसे चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर सोजरबाई राजपूत यांनी बसमध्ये तसेच बसस्थानक परिसरात चौकशी करत शोध घेतला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या