वृद्धाच्या हातातून अंगठी लांबवली; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शहरातील गणेशवाडी येथील एकाच्या हातातील २४ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी लांबविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शुक्रवार ४ फेब्रुवारी रोजी रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अरुण गिरधर धांडे (वय ७४, रा. संचित रणछोड नगर जळगाव) हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. ३१ जानेवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास शहरातील गणेशवाडी येथे अरुण धांडे हे कामानिमित्त आले होते. त्यावेळी घरी परतत असताना अनोळखी व्यक्ती दुचाकीवर येऊन त्यांच्या जवळ थांबला. त्यानंतर त्यांच्या हातातील “सोन्याची अंगठी ही खूप सुंदर आहे, मला पण अशी बनवायची आहे”, असे सांगून हात चालाखीने अरुण पांडे यांच्या हातातील २४ हजार रुपये किमतीची आठ ग्रॅम सोन्याची अंगठी चोरून नेऊन प्रसार झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

याप्रकरणी अरुण धांडे यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात शुक्रवार ४ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात दुचाकीधारकावर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक किशोर पाटील करीत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here