Monday, August 15, 2022

गॅस एजन्सीत दरोडा; साडेचार लाखाचा मुद्देमाल लंपास

- Advertisement -

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

चाळीसगाव शहरातील एका गॅस एजन्सीत चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकत रोकडसह एकूण ४ लाख ४० हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास करून भामट्यांनी पोबारा केल्याची घटना रात्री घडली. याप्रकरणी पोलिसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

- Advertisement -

अशोक किसनचंद छाबडीया (वय ५८) हे शहरातील शांतीनगर येथे परिवारासह राहतात. ते मालेगाव रोडवरील एच.पी. गॅस एजन्सीत कामाला आहेत. या एजन्सीत दिवसभरात झालेल्या गॅस विक्रीचे पैसे सायंकाळी डिलीव्हरी बॉयकडून घेऊन दुसऱ्या दिवशी बॅकेत भरणा करण्याचे काम छाबडीया हे करीत असतात.

दरम्यान २५ एप्रिल रोजी रात्री रात्री ८:३० वाजताच्या सुमारास छाबडीया हे नेहमीप्रमाणे डिलीव्हरी बॉयकडून पैसे घेऊन मोजत होते. तेवढ्यात दुकानाचा शटर वर करून भावेश मनोज माखोजा (अंदाजे वय २२, रा. उल्हासनगर) हा चाकू घेऊन मध्ये आला. छाबडीया यांना किरकोळ दुखापत करून पैसे दे अन्यथा जीवे ठार मारण्याची धमकी देऊन ३,६५,००० हजार रोकड व ७५ हजार रुपये किंमतीची हिरो होंडा कंपनीची दुचाकी (क्र. एम.एच. १९ डीएक्स २९१२) असे एकूण ४,४०,००० रूपये घेऊन पसार झाला.

याप्रकरणी छाबडीया यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात भावेश मनोज माखोजा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सपोनि विशाल टकले हे करीत आहेत.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या