Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मोर्चाची रणनीती ठरली!
    • आता गुरुजी सांगणार देश-विदेशात ऑनलाइन गणेश स्थापना
    • कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा
    • एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले
    • एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे
    • अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!
    • जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा विळखा अधिकच घट्ट!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»रस्त्याचे काम… बसला फेरा अन्‌ प्रवाशांना भुर्दंड
    जळगाव

    रस्त्याचे काम… बसला फेरा अन्‌ प्रवाशांना भुर्दंड

    चोपडा-यावल तालुक्यातील प्रवाशी त्रस्त : डांबरीकरणावर थेट काँक्रिटीकरण
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 4, 2026No Comments367 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    शहरातील शिवाजी नगर भागात रस्त्याचे कॉक्र्रिटीकरण सुरु असून चोपडा, यावलकडे जाणाऱ्या बसेस कानळदा फाट्याकडून बळविण्यात आल्याने प्रवाशांना अतिरिक्त पैशांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. रस्त्याचे काम करीत असलेल्या ठेकेदाराने मनमानी पद्धतीने काम सुरु केल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. यामुळे राज्य परिवहनच्या बसेस गावाला वळसा घावून जात असून त्यात प्रवाशांचा वेळ व पैसा जात आहे. मनपाचे देखील या रस्त्याकडे दुर्लक्ष झाले असून ठेकेदाराने चक्क डांबरीकरणावरच कॉक्रिटचा थर टाकून काम उरकण्याचा घाट घातला आहे.

    जळगाव शहरात ‘विकास’ाच्या नावाखाली सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाने सध्या नागरिकांच्या संयमाचीच परीक्षा घेतली आहे. शिवाजी नगर परिसरात सुरू असलेल्या काँक्रीटीकरणामुळे केवळ धूळ, खड्डे आणि वाहतूक कोंडीच वाढलेली नाही, तर रोजच्या प्रवासावर अवलंबून असलेल्या प्रवाशांच्या खिशालाही चटका बसू लागला आहे. चोपडा आणि यावलच्या दिशेने जाणाऱ्या राज्य परिवहनच्या बसेसना नेहमीचा मार्ग बंद असल्याने कानळदा फाट्यामार्गे वळसा घ्यावा लागत आहे. हा बदल केवळ मार्गापुरता मर्यादित नाही, तर त्याचा थेट परिणाम प्रवाशांच्या वेळापत्रकावर आणि खर्चावर होत आहे. रोजच्या कामानिमित्त किंवा शिक्षणासाठी प्रवास करणाऱ्यांना अतिरिक्त अंतरामुळे जास्त भाडे मोजावे लागत असून, वेळेचा हिशोबही पूर्णपणे कोलमडला आहे.

    या सगळ्या परिस्थितीला कारणीभूत ठरतोय तो म्हणजे रस्त्याच्या कामातील कथित मनमानी कारभार. ठेकेदाराकडून कोणतीही ठोस वाहतूक योजना न आखता काम सुरू करण्यात आल्याने वाहनचालक आणि प्रवासी दोघेही त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे, आधीपासून असलेल्या डांबरी रस्त्यावर थेट काँक्रीटचा थर टाकून काम उरकण्याचा प्रयत्न होत आहे. तांत्रिक निकषांकडे दुर्लक्ष करून घाईघाईत काम पूर्ण करण्याचा हा प्रकार भविष्यात रस्त्याच्या टिकाऊपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

    दरम्यान, महानगरपालिकेच्या भूमिकेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर काम सुरू असताना त्यावर प्रभावी देखरेख का नाही, असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे. वाहतूक व्यवस्थापन, पर्यायी मार्गांची स्पष्ट माहिती, आणि प्रवाशांच्या सोयीसाठी उपाययोजना यांचा अभाव स्पष्टपणे जाणवतो. विकासाची कामे करताना नागरिकांना होणारा त्रास कमीत कमी ठेवणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. सध्या मात्र जळगावकरांना ‘रस्ता’ नव्हे, तर समस्यांच्या खडतर प्रवासाचा सामना करावा लागत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा

    September 11, 2026

    जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार

    September 11, 2026

    यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा विळखा अधिकच घट्ट!

    September 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif