Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्ह्यात तीन हजार गणेश मंडळ; 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त!
    • लाडक्या बाप्पांचे उत्साहात आगमन!
    • जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मोर्चाची रणनीती ठरली!
    • आता गुरुजी सांगणार देश-विदेशात ऑनलाइन गणेश स्थापना
    • कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा
    • एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले
    • एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे
    • अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»अंजनसोंडे येथे दोन गटात दंगल
    गुन्हे वार्ता

    अंजनसोंडे येथे दोन गटात दंगल

    कुऱ्हाडीसह काठीने मारहाण : गुन्हा दाखल
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 29, 2026No Comments322 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    भुसावळ येथे एकास मोटारसायकल हळू चालव असे सांगितल्याचा राग येऊन कुऱ्हाडीसह काठीने मारहाण केल्याची तक्रार नोंदविण्यात आली असुन दुसऱ्या गटातर्फे मोटारसायकल अडवून मारहाण केल्याची तक्रार दाखल करण्यात आली.

    अंजनसोंडे येथील दिनकर पंढरीनाथ पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते त्यांच्या पत्नी सरलाबाई यांचे सोबत घराचे अंगणात बसले असतांना तेथून धनंजय जितेंद्र कोळी हा वेगाने मोटारसायकल घेऊन आला त्यावेळी गाडी हळू चालव येथे लहान मुले खेळतात असे सांगितले असता त्याचा राग आला तो घरी निघून गेल्यावर त्याचे वडील जितेंद्र कोळी माझे घराजवळ येवून मला शिविगाळ करुन मारहाण करायला सुरुवात केली.

    पाठोपाठ धनंजय हातात कुऱ्हाडे घेवून आला त्याने कुऱ्हाडीचा वार केला असता मी हाताने अडवण्याचा प्रयत्न केला, ती माझ्या डाव्या हाताच्या पंजाला लागली आहे. त्यावेळी घराशेजारी राहाणारे भुषण मधुकर चौधरी हे भांडण आवरण्यासाठी आले असता तेथे उभा असलेला विनोद नागो कोळी याने त्याच्या जवील काठीने भागवत पाटील यांच्या डोक्यावर प्रहार करून जखमी केले. धनंजय कोळी,  जितेंद्र कोळी आम्हाला मारहाण करत असतांना अचानक कुणीतरी दगड फेकून मारले त्यात माझी पत्नी सरलाबाई पाटील हिच्या पायास तर रूषीकेश संजय पाटील याचे डाव्या डोळ्याला दगड लागून दुखापत झाली आहे. त्यामुळे जितेंद्र कोळी, धनंजय जितेंद्र कोळी, विनोद नागो कोळी यांचे विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली.

    दुसऱ्या गटाकडून धनंजय जितेंद्र कोळी वय वीस वर्ष याने दिलेल्या फिर्यादीवरून तो दिनकर पाटील यांचे घरासमोरून मोटरसायकलवर जात असताना त्याला गाडी चालवता येत नाही असे म्हणून दिनकर पाटील यांनी शिवीगाळ केली व दिनकर पंढरीनाथ पाटील यांनी गच्ची धरून आता साप्ताने नारायण करून शिवीगाळ केली तसेच त्यांचा मुलगा नकुल दिनकर पाटील याने काठी घेऊन डाव्या हाताच्या बोटाला आणि उजव्या पायाच्या गुडघ्याजवळ मारहाण केली त्यानंतर मी घरी गेलो व माझ्या वडिलांनी त्यांना समजावण्यासाठी गेले असता त्यांना सुद्धा दिनकर पंढरीनाथ पाटील नकुल दिनकर पाटील व भागवत जगन्नाथ पाटील यांनी खाली पाडून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे

    September 11, 2026

    यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा विळखा अधिकच घट्ट!

    September 11, 2026

    आईसोबतच्या मैत्रीचा राग; रेल्वे कर्मचाऱ्याला संपवले

    September 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif