रिंगणगाव येथे ३५ वर्षीय तरुणाची आत्महत्या

0

रिंगणगाव येथे ३५ वर्षीय तरुणाची आत्महत्या

एरंडोल : तालुक्यातील रिंगणगाव येथे योगेश शंकर हटकर (वय ३५) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १६ मार्च रोजी दुपारी ३ वाजता घडली. योगेश हटकर यांनी राहत्या घरी सुताच्या दोरीने गळफास घेतला.

दुपारच्या सुमारास हा प्रकार घरच्यांच्या लक्षात आला. त्यांच्या आत्महत्येचे खरे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेबाबत रिंगणगाव येथील दगडू निंबा हटकर यांनी एरंडोल पोलीस ठाण्यात खबर दिली.

पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पोलीस निरीक्षक नीलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. दत्तात्रय ठाकरे तपास करत आहेत. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.