Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दलित, ओबीसींना हिंदू म्हणते अन् अधिकारापासून रोखते!
    • उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे दिल्लीत एकाच ताटात खातात!
    • ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून घरी नेत अत्याचार
    • राज्यात उष्णतेची लाट; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन
    • माणसाने झेपेल तितकेच बोलावे!
    • बिबट्याच्या कातडीसह पाच तस्कर गजाआड!
    • किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका आजारी
    • शॉर्ट सर्किटमुळे मक्याच्या पिकाला आग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»भद्रावतीत अवैध रेती वाहतुकीवर महसूल विभागाची कारवाई
    गुन्हे वार्ता

    भद्रावतीत अवैध रेती वाहतुकीवर महसूल विभागाची कारवाई

    दोन मोठी वाहने रंगेहात पकडून केली जप्त
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 25, 2026No Comments96 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

    भद्रावती तालुक्यात अवैध रेती वाहतूक सुरू असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. महसूल विभागाने केलेल्या धडक कारवाईत दोन मोठी वाहने रंगेहात पकडून जप्त करण्यात आली. या कारवाईत एक हायवा (८ ब्रास रेतीसह) आणि एक ट्रक (१० ब्रास रेतीसह) ताब्यात घेण्यात आला.

    महसूल सूत्रांच्या माहितीनुसार, तहसील मंडळ अधिकारी समीर वाटेकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचला. चंद्रपूरवरून अवैध रेती घेऊन येणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवण्यात आले होते. पहाटे सुमारे ५ वाजता MH-34 CQ 6099 क्रमांकाचा हायवा गुलमोहर पार्क, चिचोर्डी येथे रेती उतरत असताना रंगेहात पकडण्यात आला.

    तपासणीदरम्यान संबंधितांकडे कोणताही वैध परवाना नसल्याचे आढळून आले. त्यामुळे सुमारे ८ ब्रास रेतीसह हायवा जप्त करून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. पुढील तपासात हा हायवा चंद्रपूर येथील मीथलेश चन्ने यांच्या मालकीचा असल्याचे स्पष्ट झाले.

    दरम्यान, याच दिवशी डॉली पेट्रोल पंप परिसरात महसूल पथकाने आणखी एक मोठा ट्रक सापळा रचून पकडला. या ट्रकमध्ये सुमारे १० ब्रास रेती आढळून आली. तपासात हा ट्रक नागपूर (उमरेड) येथील वहीद शेख यांच्या मालकीचा असल्याची माहिती समोर आली आहे.

    ही कारवाई R.I. समीर वाटेकर, ग्राम महसूल अधिकारी तलहार, ग्राम महसूल अधिकारी तळवेकर आणि त्यांच्या पथकाने संयुक्तरित्या पार पाडली.

    वाढत्या अवैध वाहतुकीवर प्रश्नचिन्ह
    भद्रावती तालुक्यात अवैध रेती वाहतूक इतक्या उघडपणे कशी सुरू आहे, हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. पहाटेच्या वेळी मोठ्या प्रमाणात रेतीची वाहतूक होत असल्याने मोठ्या रॅकेटचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, बाहेरच्या जिल्ह्यातील वाहनांचाही या प्रकरणात सहभाग असल्याचे दिसून येत आहे. कारवाई होत असल्या तरी या अवैध वाहतुकीवर खरोखरच आळा बसणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे दिल्लीत एकाच ताटात खातात!

    April 17, 2026

    ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून घरी नेत अत्याचार

    April 17, 2026

    राज्यात उष्णतेची लाट; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन

    April 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.