Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!
    • दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!
    • विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
    • मनोज पाटील, शरद शिंदे, विनोद तराळसह संशयितांचे जामीन फेटाळले!
    • शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा चिंतेचा विषय!
    • मराठी भाषा विभागाच्या सात संकेतस्थळांचे नव्या डोमेनवर स्थलांतर पूर्ण
    • ९ ऑगस्टला मोफत कायदेविषयक मार्गदर्शक शिबिर
    • फ्रीलांस करिअरच्या संधी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»राज्यभरात जाहिरात फलकावर निर्बंध!
    ताज्या बातम्या

    राज्यभरात जाहिरात फलकावर निर्बंध!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 24, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई-राज्यात जाहिरात फलकांवर अनेक निर्बंध येणार असून, जास्तीत जास्त 40 फूट बाय 40 फूट आकाराचाच जाहिरात फलक लावता येणार आहे. मर्यादेपेक्षा अधिक आकाराचे जाहिरात फलक हटविण्यात येणार आहेत. इमारतींची गच्ची, आवाराची भिंत यावर जाहिरात फलक लावण्यास मनाई करण्यात आली आहे. याबाबत सर्व महापालिका, मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण यासह विविध शासकीय व निमशासकीय यंत्रणांनी एक महिन्यात कार्यवाही करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत.
    घाटकोपर येथील जाहिरात फलक दुर्घटनेनंतर राज्य सरकारने नियुक्त केलेल्या माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल आणि कृती अहवाल राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी स्वीकारला आहे. घाटकोपर येथे दि. 13 मे 2024 रोजी वारा व मुसळधार पावसामुळे प्रचंड आकाराचा जाहिरात फलक पेट्रोल पंपावर कोसळला होता. या दुर्घटनेत 17 नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरातील अनधिकृत होर्डिंगचा मुद्दा चर्चेत आला होता.

    बैठकीत महत्वाचे निर्देश
    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये जाहिरात फलकांवर अनेक निर्बंध घालण्याचा निर्णयही घेण्यात आला. मुंबईमधील घाटकोपर येथे बेकायदेशीर फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या उच्च स्तरीय चौकशीसाठी स्थापन न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल, शिफारशींसह स्वीकारला. तसेच अहवालातील निष्कर्ष, समितीने सुचविलेल्या उपाययोजनांवरील कार्यवाहीचा कृती अहवाल स्वीकारला. यावर संबंधित विभागांना एक महिन्याच्या मुदतीत कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!

    August 8, 2026

    दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!

    August 8, 2026

    विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif