अरे वा.. आता कार्ड नसतानाही ATM मधून काढता येणार पैसे !

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

सायबर क्राईमच्या घटनांमध्ये वाढ होतांना दिसताय. तसेच ATM च्या माध्यमातून चोरीचे प्रकारही वाढत आहेत. इतकेच नव्हे तर डिजिटल चोरीही सहज होतेय. त्यामुळे ATM असो की डिजिटल पेमेंट नागरिकांनी सजग राहणे गरजेचे आहे. म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नवीन प्रस्ताव आणला आहे, आता तुम्हाला ATM कार्ड नसतानाही ग्राहक पैसे काढू शकणार आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज घोषणा केली आहे की, RBI ने भारतातील सर्व बँकांमधील सर्व ATM मध्ये कार्डलेस रोख पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव दिला आहे. UPI द्वारे ही सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव आहे.

तसेच दास यांनी सांगितले की, ही सुविधा वापरताना बँक कस्टमरला एटीएममधून पैसे काढताना डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरण्याची आवश्यकता नाही. कार्ड विरहित रोख रक्कम काढण्याची सुविधा यूपीआयचा वापर करून सर्व बँकांमध्ये आणि एटीएम नेटवर्कमध्ये उपलब्ध करून दिली जावी. व्यवहारात सुलभता वाढवण्याव्यतिरिक्त, अशा व्यवहारांसाठी प्रत्यक्ष कार्डची आवश्यकता नसल्यामुळे कार्ड स्किमिंग, कार्ड क्लोनिंग इत्यादी प्रकारे होणारी फसवणूक टाळण्यास मदत होईल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.