पं. स. सभापतीपद आरक्षण जाहीर…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

जिल्ह्यातील यावल, चाळीसगाव, जामनेर व अमळनेर पंचायत समितीचे सभापतीपद सर्वसाधारण वर्गासाठी आरक्षण जाहीर झाले आहे. तसेच जळगाव व एरंडोल पंचायत समितींचे सभापतीपद मागास प्रवर्गातील महिलांसाठी राखीव असणार आहे.

जिल्ह्यातील पंचायत समितींचे सद्यस्थितीत लागू असलेल्या सभापतीपद आरक्षणाच्या समाप्तीनंतर पुढील उर्वरित कालावधीकरीता अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती,नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिलांसाठी सोडत पद्धतीने आरक्षित करण्यासाठी गुरुवारी जिल्हा नियोजन भवनात अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांच्या अध्यक्षतेखाली सोडत सभा झाली. उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांची आरक्षणाची प्रक्रिया सांगितली. नायब तहसीलदार रुपाली काळे उपस्थित होत्या.

ग्रामविकास विभागाने पंचायत समितींना सध्या लागू असलेल्या आरक्षणाच्या मुदतीच्या समाप्तीनंतर येणाऱ्या दिवसापासून आरक्षितसह सभापतीपदांची संख्या ठरवून दिलेली होती. त्यानुसार अनुसूचित जाती महिला (महिला) 1, अनुसूचित जमाती 2, अनुसूचित जमाती (महिला) 1, नागरिकांचा मागासवर्गाच्या प्रवर्गासाठी (विमुक्त जाती व भटक्या जमातीसह) 1, नागरिकांचा मागासवर्गाच्या प्रवर्गासाठी (महिला) (विमुक्त जाती व भटक्या जमातीसह) 2, सर्वसाधारण प्रवर्गासाठी 4, सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी 4 असे एकूण 15 सभापतीपदांचा त्यामध्ये समावेश आहे.

पारोळा पंचायत समिती सभापतीपद थेट अनुसूचित जाती (महिला) साठी आरक्षित करण्यात आले. धरणगाव, जळगाव व एरंडोल या नामाप्रसाठी आरक्षित पंचायत समितीपैकी दोन पंचायत समितीसाठी महिला आरक्षण काढण्यात आले. त्यानुसार उर्वेश योगेश पाटील या चिमुकल्याच्या हस्ते नागरिकांचा मागास (महिला) प्रवर्गासाठी एकूण दोन पंचायत समितींच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या. त्यानुसार जळगाव व एरंडोल पंचायत समितींचे सभापतीपद आरक्षित झाले.

महिला राखीवसाठी यावल, रावेर, मुक्ताईनगर, भडगाव ,चाळीसगाव, पाचोरा, जामनेर व अमळनेर या आठ पंचायत समितींचे आरक्षण काढणे आवश्यक होते मात्र, अमळनेर पंचायत समिती सभापतीपद 20 डिसेंबर 2019 ते 20 मार्च 2022 या कालावधीसाठी सर्वसाधारण महिला पदाकरीता आरक्षित असल्याने अमळनेर वगळण्यात आले. उर्वरित सात पंचायत समितींमधून चार पंचायत पंचायत समितींच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या. त्यानुसार रावेर, भडगाव, मुक्ताईनगर व चाळीसगाव पंचायत समितींचे सभापतीपद सर्वसाधारण (महिला) आरक्षित झाले.

भुसावळ, बोदवड व चोपडा या पंचायत समितींच्या चिठ्ठ्यांमधून चोपडा पंचायत समितीचे सभापतीपद अनुसूचित महिलासाठी आरक्षित झाले. आरक्षणावर 25 नाेव्हेंबरपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत शाखेत आक्षेप घेता येणार आहेत.

पंचायत समितीनिहाय सभापतीपदाचे आरक्षण…

पारोळा (अनुसूचित जाती महिला), भुसावळ, बोदवड, चोपडा(अनुसूचित जमाती), जळगाव, एरंडोल (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला), रावेर, भडगाव, मुक्ताईनगर, चाळीसगाव (सर्वसाधारण महिला), चोपडा (अनुसूचित जमाती महिला), यावल, जामनेर, अमळनेर (सर्वसाधारण), धरणगाव (नागरिकांचा मागास प्रवर्ग).

Leave A Reply

Your email address will not be published.