Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    • प्रेमसंबंधाचा विरोध ठरला जीवघेणा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»आईसोबतच्या मैत्रीचा राग; रेल्वे कर्मचाऱ्याला संपवले
    गुन्हे वार्ता

    आईसोबतच्या मैत्रीचा राग; रेल्वे कर्मचाऱ्याला संपवले

    डोक्याखाली अन् पाठीवर केले जीवघेणे वार : अल्पवयीन तरुणास अटक
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 11, 2026No Comments851 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    भुसावळ

    आई आणि रेल्वे कर्मचाऱ्यामधील मैत्रीपूर्ण संबंधांचा संशय मनात धरून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने ३५ वर्षीय रेल्वे कर्मचाऱ्याची चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (१० सप्टेंबर) रात्री भुसावळ शहरातील पाटीलमळा परिसरात घडली. तुषार गोविंद सोनवणे (वय ३५, रा. समतानगर, भुसावळ) असे मृत रेल्वे कर्मचाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेतले आहे.

    पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संशयित मुलाच्या आईचे आणि तुषार सोनवणे यांचे मैत्रीपूर्ण संबंध असल्याचा संशय मुलाच्या मनात होता. या कारणातून त्याने काही दिवसांपूर्वीच तुषार यांच्या हत्येचा कट रचल्याची माहिती समोर आली आहे.

    गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास संशयिताने तुषार सोनवणे यांना फोन करून त्यांचे वडील नाशिकला गेल्याचे सांगितले. त्यानंतर तो एमएच १९ सीएच १४०५ क्रमांकाच्या दुचाकीवरून पाटीलमळा परिसरात तुषार यांना घेण्यासाठी गेला. तुषार यांना सोबत घेऊन परत येत असताना संशयिताने दुचाकी तुषार यांना चालविण्यास सांगितली. तुषार दुचाकी चालवत असताना घराजवळ पोहोचताच संशयिताने पाठीमागून त्यांच्या डोक्याच्या खालील भागावर तसेच पाठीवर धारदार चाकूने वार केले. या हल्ल्यात तुषार गंभीर जखमी झाले.

    घटनेनंतर तातडीने ११२ या आपत्कालीन क्रमांकावर माहिती देण्यात आली. माहिती मिळताच बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी तुषार यांना रुग्णवाहिकेतून भुसावळ येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.  दरम्यान, जळगाव गुन्हे शाखेचे पथक त्यावेळी शहरातच होते. घटनेची माहिती मिळताच पथकाने तत्काळ संशयिताचा पाठलाग करून काही अंतरावर त्याला ताब्यात घेतले.

    घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल वाघ यांनी पथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनेतील पुरावे संकलित करण्यासाठी फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले. अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांनीही घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली.

    पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात शांततेचे वातावरण असताना रात्रीच्या सुमारास घडलेल्या या निर्घृण हत्येमुळे पाटीलमळा परिसरासह भुसावळ शहरात खळबळ उडाली.  या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४४७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन संशयित पोलिसांच्या ताब्यात असून या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि राहुल तायडे करीत आहेत. घटनेनंतर परिसरात सध्या शांतता असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!

    October 6, 2026

    वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द

    October 6, 2026

    दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif