भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे शाखा उदघाटन पाचोरा भडगाव विधानसभा क्षेत्र प्रमुख तथा भडगाव तालुका अध्यक्ष एस. डी. खेडकर यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक मंत्री रामदास आठवले यांच्या गाव तेथे शाखा या संकल्पनेतून राज्य उपाध्यक्ष रमेश मकासरे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंढे, जळगाव पश्चिमचे जिल्हा अध्यक्ष आनंद खरात यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली शाखा उदघाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
या प्रसंगी पाचोरा तालुका अध्यक्ष विनोद अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली भडगाव तालुका अध्यक्ष एस. डी. खेडकर यांनी उदघाटन केले. या प्रसंगी पश्चिम जिल्हा उपाध्यक्ष सचिन बागुल, युवा जिल्हा उपाध्यक्ष वाल्मिक लोखंडे, माजी सरपंच ईश्वर बाविस्कर, भडगाव युवक अध्यक्ष देविदास बाविस्कर, दिपक दांडगे, भडगाव शहर उपाध्यक्ष गोरख राखुंडे, पीरा राखुंडे, धोंडू राखुंडे उपस्थित होते. या प्रसंगी जिल्हा अध्यक्ष आनंद खरात यांच्या आदेशाने शाखा कार्यकरणी घोषित करण्यात आली.
अध्यक्ष सुरेश नाना राखुंडे, उपाध्यक्ष उत्तम फाजगे, कार्यध्यक्ष मधुकर श्रवण हातागले, सचिव कैलास गोविंदा फाजगे, खजिनदार पिरण सुधाकर हातागडे, बुथ प्रमुख काशिनाथ हातागळे, संघटक विष्णू कसबे, प्रसिद्धीप्रमुख दीपक कसबे, सल्लागार जितू फासगे, मालू कसबे, शंभू फाजगे, गणेश हातागळे, साहेबराव कसबे, मुकेश हातागले, सदस्य भीमा फासगे, भीमा कसबे, गोमा कसबे, चंदू कसबे, महेंद्र लांडे, लक्ष्मण फासगे, प्रवीण हातागले, रवींद्र कसबे, रवी लांडे, श्याम हातागले, रामू फासगे, नाना फासगे, राहुल हातागले, उमेश कसबे, कृष्णा हातागळे, बद्रीनाथ फासगे अशी कार्यकारणी घोषित करण्यात येऊन त्यांचे सर्वांचे कौतुक करत अभिनंदन करण्यात आले.