Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    • हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
    • दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»संपादकीय»ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    संपादकीय

    ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 6, 2026No Comments100 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही संपादकीय लेख

    जळगाव जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या वतीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हटाव, एसआयआर रद्द करा, ईव्हीएम मशीनऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, यासाठी जळगावात आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकापासून मोर्चाद्वारे महाविकास आघाडीचे सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर गेले. तेथे एका शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. त्यानंतर मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले आणि त्या सभेत अनेक नेत्यांची भाषणे झाली. या मोर्चात माजी आमदार शिरीष चौधरी, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अविनाश भालेराव, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद चौधरी, उद्धव ठाकरे सेनेचे उपनेते गुलाब वाघ आदी उपस्थित होते. ज्ञानेश कुमार यांनी एसआयआरच्या माध्यमातून भाजपला मदत होईल, असे काम केले आहे. त्यासाठी सर्वप्रथम त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे. त्यानंतर एसआयआर रद्द केली पाहिजे. त्यानंतर ईव्हीएम मशीनऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या पाहिजेत, असा सूर असलेली भाषणे झाली. जळगाव जिल्ह्यात ज्ञानेश कुमार यांच्या बाबतीत आतापर्यंत कसलेही आंदोलन झाले नव्हते. हे आंदोलन करून आम्ही काही मागे नाही, हे दाखवून देण्यात आले आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी अशा प्रकारचे आंदोलन हे झालेच पाहिजे. जळगाव हे मागे होते, पण ते आंदोलनही पार पडले. आंदोलनात आमचाही खारीचा वाटा आहे, हे जळगाव जिल्ह्याने दाखवून दिले. एकंदरीत ज्ञानेश कुमार यांच्या बाबत जळगाव जिल्हा मागे नाही, हेच या आंदोलनाने दाखवून दिले. आगामी निवडणुकीत म्हणजे झेडपीच्या निवडणुका या बॅलेट पेपरवर झाल्या, तर त्यांची पहिली झलक बघायला मिळेल. त्यानंतर मग कुणाला महत्त्व चोरण्याचा अधिकार राहणार नाही. पण केंद्र सरकार बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायला तयार होईल का, हा खरा प्रश्न आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव

    November 8, 2026

    दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!

    November 7, 2026

    जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीचे जागावाटप गिरीश महाजनांकडे!

    November 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif