Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नव्या आयुक्तांकडून अपेक्षा!
    • जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 
    • तुकाराम मुंढे यांचा धडाका : भेसळकरांना भरली धडकी!
    • अमृत योजनेच्या निकृष्ट कामाविरोधात मनपावर ‘घागर फोडो’ मोर्चा!
    • इस्रायलमध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार
    • कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक
    • पाकिस्तानच्या जवानांचा थेट कामावर येण्यास नकार
    • युवासेना आयोजित जिल्हास्तरीय ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्तीसह धोकादायक झाडे, फांद्या हटवा
    जळगाव

    पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्तीसह धोकादायक झाडे, फांद्या हटवा

    महापौर दीपमाला काळे यांचे प्रशासनाला कडक आदेश
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 10, 2026No Comments74 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    पावसाळा तोंडावर आलेला असताना शहरात नागरी सुविधांची दैना उडू नये, यासाठी जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. महापौरांनी त्यांच्या दालनात बांधकाम विभागाची तातडीची बैठक बोलावून पावसाळापूर्व कामांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासह धोकादायक झाडे व फांद्या हटवण्याचे स्पष्ट आदेश त्यांनी प्रशासनाला दिले.

    धोकादायक झाडे आणि फांद्यांचा प्रश्न: पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे झाडे पडून दुर्घटना होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी रस्त्यांवरील सर्व धोकादायक झाडे, फांद्या आणि विजेच्या तारांना स्पर्श करणाऱ्या फांद्या तातडीने तोडण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत.

    रस्ते दुरुस्ती आणि खड्डे मुक्ती: शहरातील मुख्य रस्ते आणि अंतर्गत रस्त्यांवर पडलेले मोठे खड्डे बुजवून त्यांची डागडुजी करण्याचे काम प्राधान्याने हाती घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. जेणेकरून पावसाळ्यात वाहनधारकांची गैरसोय होणार नाही. नगरसेवकांच्या प्रस्तावांना गती: विविध प्रभागांतील नगरसेवकांनी रस्ते आणि गटारींच्या कामांबाबत जे प्रस्ताव सादर केले आहेत, त्या प्रस्तावांवर विलंब न लावता तातडीने ‘इस्टिमेट’ (अंदाजपत्रक) तयार करण्याचे निर्देश महापौरांनी संबंधित अभियंत्यांना दिले.

    या बैठकीत नियोजित कामांचा आराखडा सादर करण्यात आला. यावेळी महापौर दीपमाला काळे यांच्यासह योगेश बोरोले (शहर अभियंता) संदीप मोरे (विद्युत विभाग प्रमुख), बांधकाम विभागातील सर्व कनिष्ठ व शाखा अभियंता आणि संबंधित कर्मचारी उपस्थित होते. शहराचा विकास आणि पावसाळ्यातील आपत्ती निवारण या दोन्ही आघाड्यांवर महापालिकेने आतापासूनच कंबर कसली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 

    June 9, 2026

    कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक

    June 9, 2026

    अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ : बंद घराचे कुलूप तोडले

    June 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif