रेल्वे व्यवस्थापकांनी बडनेरा व मूर्तिजापुर स्थानकांची केली पाहणी

0

भुसावळ , लोकशाही न्यूज नेटवर्क

रेल्वेमध्ये प्रवाशांना सुविधा देण्यासाठी भारत सरकारकडून अमृत भारत अभियानातुन प्रयत्न केले जात आहेत. विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस एस केडिया गति शक्ती युनिटचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक नवीन पाटील व इतर अधिकाऱ्यांनी अमृत भारत योजनेअंतर्गत बडनेरा व मूर्तिजापुर या स्थानकांची पाहणी केली. बडनेरा स्टेशन वर 3 री व 4 थी लाइन चे प्लानिंग, स्टेशन च्या उत्तर व दक्षिण बाजुस प्रवेश द्वार, प्रवाशाला ड्रॉप अँड गो, स्टेशनच्या दोन्हीं बाजूला दुचाकी व चारचाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था, पाथवे, स्थानकावरील शेड, प्रतिक्षालय, आराम कक्ष, पादचारी पूल, लिफ्ट, सरकता जीना, गार्डन याची पाहणी व प्लानिंग करून तसे सूचना असेल याबाबत माहिती देण्यात आली.

या निरीक्षण दरम्यान वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ.शिवराज मानसपुरे, वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता पालटासिंग, वरिष्ठ विभागीय सिग्नल व दूरसंचार अभियंता विजय कांची, वरिष्ठ मंडल अभियंता रोहित मेहला , विभागीय सुरक्षा आयुक्त श्रीनिवास राव व मंडल अभियंता शुक्ला, सहायक सुरक्षा आधिकारी सोनवने आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here