रेल्वेच्या धडकेत दापोरा येथील युवकाचा मृत्यू

0

रेल्वेच्या धडकेत दापोरा येथील युवकाचा मृत्यू

जळगाव: दापोरा (ता. जळगाव) येथील विजय रमेश चव्हाण (वय २८) या युवकाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला. ही दुर्घटना सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेची नोंद एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.

विजय चव्हाण हे शेळीपालन व्यवसाय करत होते आणि आपल्या कुटुंबाच्या उपजीविकेस मदत करत होते. काही वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता, मात्र ते पत्नीपासून विभक्त होते. सोमवारी रात्री विजय चव्हाण दापोरा शिवारातील शिवलवनजवळ रेल्वे रुळ ओलांडत असताना रेल्वेची धडक बसल्याने त्यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच लोकोपायलटने तत्काळ एमआयडीसी पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलवला. विजय चव्हाण यांच्या निधनाने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्या पश्चात आई, दोन भाऊ व वहिनी असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.