Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्ह्यात तीन हजार गणेश मंडळ; 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त!
    • लाडक्या बाप्पांचे उत्साहात आगमन!
    • जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मोर्चाची रणनीती ठरली!
    • आता गुरुजी सांगणार देश-विदेशात ऑनलाइन गणेश स्थापना
    • कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा
    • एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले
    • एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे
    • अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»बुलडाणा अर्बनच्या स्वमालकीच्या वास्तूत स्थलांतर सोहळा
    ताज्या बातम्या

    बुलडाणा अर्बनच्या स्वमालकीच्या वास्तूत स्थलांतर सोहळा

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 22, 2026No Comments29 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    बुधवारी भव्य कार्यक्रम : सहकार क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

    जळगाव – सहकार क्षेत्रात कार्यरत असलेल्या बुलडाणा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या जळगाव खान्देश शाखेचा स्वमालकीच्या जागेतील स्थलांतर सोहळा बुधवार दि. 26 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5:30 वाजता आयोजित करण्यात आला आहे. शहरातील प्रतापनगर, ढाके कॉलनी गणेश कॉलनी रोडवरील राजश्री शाहू कॉम्प्लेक्ससमोरील बुलडाणा अर्बन भवन येथे या स्वमालकीच्या वास्तूत स्थलांतर होणार आहे. या सोहळ्याला सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
    या सोहळ्यास बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक, बुलडाणा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेडचे अध्यक्ष डॉ. सुकेश झंवर, बुलडाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटीच्या अध्यक्षा कोमल झंवर, पाचोरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुभाष तोतला यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. उद्घाटनानंतर कानळदा रोडवरील के.सी. पार्कसमोरील समर्थ लॉन्स येथे मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून उपस्थितांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे.
    बुलडाणा अर्बनकडून आर्थिक व्यवहारांसोबतच विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असल्याचे संस्थेने नमूद केले आहे. तिरुपती बालाजी, माहूरगड, शिर्डी, तुळजापूर, अयोध्या आणि पंढरपूर येथे भक्तनिवास सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. बुलडाणा येथील सहकार विद्या मंदिरात सीबीएसई पॅटर्न निवासी शाळेसह संस्थेच्या विविध ठिकाणी 26 शाळा इंग्रजी माध्यमाच्या असून एकूण 30 हजार विद्यार्थी शाळांमधून शिक्षण घेत आहेत. याशिवाय सभासदांच्या पाल्यांसाठी पुणे व बुलडाणा येथे वसतिगृह सुविधा, बुलडाणा व मोर्शी येथे गो-रक्षण धाम, बुलडाणा येथे वेद विद्यालय, महामार्गांवर रुग्णवाहिका सेवा तसेच स्वर्गरथ सेवा,बीओटी तत्वावर महामार्गाचे बांधकाम (मलकापूर ते चिखली) अशा विविध सामाजिक उपक्रमांचा संस्थेच्या कार्यात समावेश आहे. सोनेतारण कर्ज, वेअरहाऊस पावती तारण कर्ज, एलआयसी तारण कर्ज तसेच लॉकर सुविधा यांसारख्या विविध सेवा संस्थेच्या शाखांमधून उपलब्ध करून देण्यात येत आहेत. वेअरहाऊस सुविधेमुळे शेतकरी व व्यापाऱ्यांना विविध प्रकारचे धान्य व कृषीमाल सुरक्षितपणे साठवता येत असल्याचे संस्थेने स्पष्ट केले आहे.

    जिल्ह्यात 32 शाखांचे जाळे
    बुलडाणा अर्बनने जळगाव जिल्ह्यात आपल्या सेवांचा विस्तार केला असून जिल्ह्यात एकूण 32 शाखा असल्याची माहिती संस्थेतर्फे देण्यात आली आहे. जळगाव, भुसावळ, वरणगाव, रावेर, फत्तेपूर, जामनेर, पाचोरा, नगरदेवळा, चोपडा, गोलाणी मार्केट, चाळीसगाव आणि धरणगाव यासह विविध ठिकाणी संस्थेची स्वमालकीची शाखा कार्यालये कार्यरत आहेत. जिल्ह्यात संस्थेची 7 स्वमालकीची गोदामे असून त्यांची एकत्रित क्षमता सुमारे 4 लाख 50 हजार पोत्यांची आहे. जळगाव व भुसावळ येथे 2 स्वमालकीची शीतगृहे असून त्यांची क्षमता सुमारे 1 लाख 50 हजार पोत्यांची असल्याचे संस्थेने नमूद केले आहे.

    511 कोटींच्या ठेवी; 458 कोटींचे कर्ज
    जिल्ह्यात संस्थेच्या एकूण 511 कोटी रुपयांच्या ठेवी असून सुमारे 458 कोटी रुपयांचे कर्ज वितरण झाले आहे. यामध्ये सोनेतारण कर्ज 321 कोटी असून 35 कोटी वेअरहाऊस तारण कर्ज आहे. शेतकरी व व्यापाऱ्यांना धान्य साठवणुकीसाठी वेअरहाऊसच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे संस्थेने म्हटले आहे. बुलडाणा अर्बनच्या एकूण संस्थात्मक विस्तारात 482 शाखा आणि 462 गोदामे असल्याचे संस्थेतर्फे नमूद करण्यात आले आहे. संस्थेच्या एकूण ठेवी 16,177 कोटी रुपये, एकूण कर्ज 11,795 कोटी रुपये, सभासद संख्या 16 लाख 5 हजार 841, सोनेतारण कर्ज 5,672 कोटी रुपये आणि वेअरहाऊस तारण कर्ज 440 कोटी रुपये असल्याची माहिती देण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जिल्ह्यात तीन हजार गणेश मंडळ; 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त!

    September 14, 2026

    कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा

    September 11, 2026

    जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार

    September 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif